Ad Code

कांद्याला राज्यात 2200 रुपयांपर्यत क्विंटलला दर

 

                                  

नाशिक ः महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यात आज दि, 24 जून रोजी गुरुवारी कांद्याला प्रत्येक क्विंटलला 2200 रुपयापर्यत भाव मिळाला आहे. मागील आठवड्यात हा भाव 2000 रुपये क्विंटल होता. त्यामुळे कांदा दरात हळू हळू वाढ होत असल्याचे दिसत आहे. नाशिकमधील लासलगाव,  अहमदनगर मधील विविध बाजार समितीत कांदा अधिक प्रमाणात विक्रीला येत आहे. 

कोरोनामुळे लाॅकडाऊन झाल्यावर कांद्याचे बाजार बंद असल्याने अनेक शेतकऱ्यांना कांदा विकता आला नाही. आता बहूतांश भागात कांदा लिलाव सुरु असल्याने विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात बाजारात उन्हाळ कांदा येत आहे. आज गुरुवार दि, 24 जून रोजी नाशिक जिल्ह्यातील कळवण बाजार समितीत एक नंबरच्या कांद्याला 2000 ते 2100 व सरासरी 1800 ते 1900 रुपये दर मिळाला. कांद्यासाठी प्रसिद्ध असलेल्या लासलगाव बाजार समितीत 600 ते 2252 रुपयाचा दर मिळाला.

हे ही वाचा ः कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका पाहून सुविधा उभाराव्या लागतील ः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 

अहमदनगर येथील बाजार समितीत गुरुवारी दि. 24 जून रोजी एक नंबरच्या कांद्याला 1600 ते 2200 रुपये, दोन नंबरच्या कांद्याला 1050 ते 1600 ते 1050, तीन नंबरच्या कांद्याला 600 ते 1050 व चार नंबरच्या कांद्याला 300 ते 600 रुपयाचा एका क्विंटल भाव मिळाला. त्यामुळे कांदा दरात हळुहळु वाढ होत आहे. काही बाजार समितीत कांद्याचे दर कमीही केल्याचे  दिसत आहे. टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu