Ad Code

ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ थेट नगरच्या कार्यक्रमाला येणार


नगर ः छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्यभिषेक सोहळा रविवारी दि. 6 साजरा होत आहे. त्यानिमित्त राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतीत शिवस्वराज्यभिषेक दिन साजरा केला जात आहे. राज्याचे ग्रामविकासमंत्री या कार्यक्रमासाठी  रविवारी थेट नगरला येत आहेत. येथे हा जोरदार कार्यक्रम साजरा होत होणार आहे. नगर जिल्हा परिषदेच्या स्थापनेला 60 वर्ष पुर्ण होत असल्याने येथे हा कार्यक्रम होत आहे. 

छत्रपती शिवाजी महाराज शिवस्वराज्यभिषेक सोहळा यावर्षीपासुन ग्रांमपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेत साजरा करावा असे आदेश सरकारने दिले आहेत.त्या दृष्टीने ग्रामविकास विभागाने तशा सूचना दिल्या. ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ हेच या कार्यक्रमासाठी रविवारी नगरला येत आहेत. 

जिल्हा परिषदेत हा कार्यक्रम होत असुन सकाळी 9 वाजता सर्व पदाधिकारी, अधिकारी आणि कर्मचारी भगव्या स्वराज्यध्वजासह शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारुन त्यास अभिवादन करणार आहेत.  याच वेळी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानअंतर्गत नगर जिल्ह्यातील स्वयंसहाय्यता गटांच्या उत्पादनाचे अॅनलाईन शाॅपिंगसाठी साईज्योती ई मार्केट प्लेस चे शुभारंभही होणार आहे. 

आॅक्सीजन देणारी 7 जीवनदायी वृक्ष

जिल्हा परिषद अध्यक्ष राजश्री घुले पाटील, उपाध्यक्ष प्रतापराव शेळके, सभापती सुनील गडाख, काशीनाथ दाते. उमेश परहर, मिराताई शेटे, मुख्यकार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर उपस्थित राहणार असल्याचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी वासुदेव साळुंके यांनी सांगितले आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu