महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी (जि. अहमदनगर) ः राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्याकडून यावर्षीही शेतकऱ्यांना कांदा बियाणाची आॅनलाईन विक्री करणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी आॅनलाईन नोंदणी करण्याचे अवाहन केले आहे. बियाणाची विक्रीला शुक्रवारी दि. 11 जून रोजी सुरवात होणार होती. मात्र काही अडचणीमुळे ती आता दि. 14 जून रोजी होणार असल्याचे कृषी विद्यापीठाने जाहीर केले आहे. 14 जून रोजीच शेतकऱ्यांनी खालील वेबसाईडवर नोंदणी करावी.
------
हे ही वाचा ः शेतकऱ्यांना विद्यापाठाचा सल्ला ः तुर, सोयाबीनचे हे वाण पेरण्याचे अवाहन
----
कोरोना विषाणू संसर्गाचा मागील वर्षी उद्रेक झाल्यामुळे महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कांदा बियाणाची विक्री कशी करावी असा प्रश्न विद्यापीठाच्या अधिकारी वर्गाला पडला होता. कारण विद्यापीठाच्या कांदा बियाणाला नेहमीच प्रचंड मागणी असते. बऱ्याचदा बियाणे विक्री पोलीस संरक्षणात सुद्धा करावी लागते. त्यामुळे मागील वर्षी ऑनलाईन पद्धतीने कांदा बियाणे विक्री करण्याचा निर्णय झाला होता. मागील वर्षी ऑनलाईन नोंदणीला अडचणी आल्या तरी सुद्धा यावर्षी नोंदणी पद्धतीत आणि संगणक प्रणालीमध्ये सुधारणा करून कोरोना विषाणू संसर्ग टाळण्यासाठी ऑनलाईन पद्धतीनेच कांदा बियाणे विक्री करण्याचा मानस महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील यांनी व्यक्त केला. त्यामुळे संगणक प्रणालीमध्ये योग्य तो बदल करून येत्या 11 जूनला ऑनलाईन पद्धतीने कांदा बियाणे विक्रीचा निर्णय महात्मा फुले कृषी विद्यापीठाने घेतला होता. मात्र आॅनलाईन नोंदणीत अडचणी अाल्याने आता 14 जुन रोजी पासून आॅनलाईन नोंदणी बियाणे विक्री होणार आहे.
------
हे ही वाचा ः # शेतकऱ्याांना सल्ला ः भुईमुग, मुग, उडीद, मका, बाजरीसाठी आहेत हे वान फायद्याचे
------
गील वर्षी पोर्टलवर नोंदणी करून नंतर बँकेच्या खात्यात ऑनलाईन पद्धतीने पैसे भरून नोंदणी पूर्ण केली गेली. परंतु या वर्षी ॲमेझॉन, फ्लिपकार्ट या ऑनलाईन कंपन्यांच्या नोंदणीप्रमाणेच *फुले ॲग्रो मार्ट पोर्टल* वर नोंदणी करून लगेचच इंटरनेट बँकिंग, डेबिट कार्ड याद्वारे पैसे भरून नोंदणी पूर्ण करता येईल. त्यासाठी https://www.phuleagromart.org या वेबसाईटवर नोंदणी करावी असे , अशी माहिती बियाणे विभागाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. आनंद सोळंके यांनी सांगितले. आधारकार्ड, सातबारा उतारा दोन किलो बियाणे या प्रमाणात फुले समर्थ आणिबसवंत 780 या बियाणाची नोंदणी करता येणार आहे. त्यासाठी बियाणाचा *दर प्रति किलो रुपये 2000/- असा असणार आहे. नोंदणी पद्धत अत्यंत सोपी असून आधारकार्ड आणि सातबारा उतारा https://www.phuleagromart.org या पोर्टलवर अपलोड करून नोंदणी करता येणार आहे. नोंदणी पूर्ण होताच लगेचच इंटरनेट बँकिंग, डेबिट कार्ड यांचे सहाय्याने पेमेंट करून खरेदीची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी जोपर्यंत पोर्टलवर बियाणांची उपलब्धता दिसते तोपर्यंतच बियाणे नोंदणी करावी. पोर्टलवरील बियाणे उपलब्धता संपताच पुढे नवीन नोंदणी व्यवस्थेमध्ये होणार नाही.
0 टिप्पण्या