Ad Code

# politics मला कोणी शिकवायची गरज नाही, संभाजीराजेचा पलटवार


अहनदनगर (प्रतिनिधी) : खासदार संभाजी छत्रपती आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यातील वाद काही थांबताना दिसत नाही. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून संभाजीराजेंनी चंद्रकांत पाटलांवर टीका केली आहे. मला कुणी शिकवण्याची गरज नाही. देवेंद्र फडणवीसांनी जर मला सल्ला दिला तर बोलेल. आता बोलणार नाही, अशा शब्दांत खासदार छत्रपती संभाजीराजे महाराज यांनी  भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांना सुनवले आहे. 


नगर जिल्ह्यातील कोपर्डी येथील निर्भयावरील निर्दयी अत्याचारानंतर राज्यातील मराठा समाज एकवटला होता. तेथून पुढे न्यायासाठी राज्यभर मराठा समाजाने लाखोंचे मोर्चे शांततेत काढून जगासमोर आदर्श निर्माण केला होता. त्याच कोपर्डी गावांत शनिवारी दि. 12 जून रोजी मराठा आरक्षणासाठी एल्गार पुकारलेले खासदार छत्रपती संभाजीराजे महाराज यांनी भेट दिली. निर्भयाच्या स्मृतीस्थळी अभिवादन केले. मराठा समाजाचे नेते संजीव भोर पाटील यांच्यासह समाजातील अनेक मान्यवर उपस्थित होते 


यावेळी खासदार छत्रपती संभाजीराजे म्हणाले, समाजाचे खासदार संभाजी छत्रपती आज कोपर्डीत आले होते. यावेळी त्यांनी पीडिताच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली. त्यावेळी त्यांना 16 जूनच्या मोर्चाविषयी विचारण्यात आलं. तसेच चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या टीकेवरही विचारण्यात आलं. त्यावर मी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शाहू महाराजांचा वंशज आहे. त्यामुळे मी लोकांना वेठीस धरू शकत नाही. 2007 पासून मी मराठा आंदोलनात आहे. हे केव्हा आले हेच मला कळत नाही. जरा त्यांना विचारा, असं सांगतानाच मला कुणी शिकवण्याची गरज नाही. मला देवेंद्र फडणवीस सल्ला देत असतीर तर मी त्यावर बोलेन, असं संभाजीराजे म्हणाले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu