संभाजीराजे दहातोंडे पाटील
अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यात खरिप हंगाम सुरू झाल्याने शेतकऱ्यांची खते मिळवण्यासाठी धडपड सुरू आहे. नगर जिल्ह्यातील बहुतांश भागात तीव्र टंचाई असतानाही युरिया खताचा बफर स्टॉक करून ठेवला जात आहे. मुळात ही प्रशासनाची मनमानी आहे. जिल्हा प्रशासनाने आजीबातखत साठणूक न करता आलेले सर्व खत विक्रीसाठी उपलब्ध करुन देत शेतकऱ्यांची टंटाई कमी करावी अशी मागणी शेतकरी मराठा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष संभाजीराजे दहातोंडे पाटील यांनी केली आहे.
युरिया टंचाईचा फायदा घेत अनेक ठिकाणी चढ्या दराने युरियाची विक्री होत आहे. त्याबाबत लक्ष घालून चढ्या दराने होत असलेली विक्री थांबवावी अशी मागणी त्यांनी केली आहे.संभाजीराजे दहातोंडे पाटील म्हणाले की,, अहमदनगर जिल्ह्यात सध्या खरिपामुळे युरिया खताची शेतकऱ्यांना गरज आहे. असे असताना उपलब्ध झालेले खत विक्रीसाठी उपलब्ध करुन न देता ते साठवून बफर स्टॉक केला आहे. सुमारे साडेपाच हजार टन युरिया खत साठवून ठेवले आहे. शेतकऱ्यांची मात्र विक्रेत्यांकडे युरिया देण्यासाठी याचना सुरूच आहे. त्याचाच फायदा घेऊन काही ठिकाणी लिंकिंग करून तर काही ठिकाणी चढ्या दराने खताची विक्री होत असल्याचे शेतकरी सांगत आहेत.
अहमदनगर जिल्ह्यात यंदा पावणे सात लाख हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी होण्याचा अंदाज धरून कृषी विभागाने खते व बियाणांचे नियोजन केले आहे. जिल्ह्यातील प्रमुख पीक असलेल्या बाजरी, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना युरियाची अधिक गरज असते. सध्या पेरण्याला काही भागात सुरूवात झाली असून, खते, बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरु आहे. सर्वाधिक मागणी असलेल्या युरियाची यंदाही बहुतांश भागात टंचाई निर्माण झाली आहे.
टंचाईच्या काळात खताची मागणी वाढली तर शेतकऱ्यांना अडचणी निर्माण होऊ नये म्हणून युरिया पुरवठा करण्यासाठी युरियाचा बफर स्टॉक करण्याला शासनाची परवानगी आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती काम करीत आहेत. समितीचे जिल्हाधिकारी अध्यक्ष असले तरी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आणि कृषी विकास अधिकारी यांची भूमिका यात महत्त्वाची असते. त्यांनीच वस्तुस्थिती जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनात आणून देणे गरजेचे आहे. मात्र नगर जिल्ह्यात असे होताना दिसत नाही.
दरम्यान, सध्या जिल्हाभर युरियाची टंचाई असतानाही कृषी विभागाने युरियाचा बफर स्टॉक केली जात आहे. आतापर्यंत सुमारे साडेपाच हजार टन खत स्टॉकमध्ये साठवून ठेवले आहे. ८ हजार १० टनापर्यंत युरिया खत साठवून ठेवण्याची परवानगी असल्याचे अधिकारी संगत आहेत. विशेष म्हणजे खते, बियाणांचा काळाबाजार, चढ्या भावाने विक्री होऊ नये यासाठी तालुका व जिल्हा पातळीवर भरारी पथके कार्यरत आहेत. या बाबत तातडीने कारवई करुन शेतकऱयांना युरिया उपलब्ध करुन द्यावा.
0 टिप्पण्या