Ad Code

#आऱक्षणाबाबत खासदार श्रीमंत उदयनराजे कडाडले, म्हणाले तर उद्रेक होईलपुणे ः मराठा समाजाला आरक्षण देण्याची सर्वच पक्षांतील लोकांची जबाबदारी आहे. मात्र आरक्षण देण्याची मानसिकताच दिसत नाही. हे लोक सभागृहात एक व बाहेर एक बोलतात.  असेच लोकांना झुलवत ठेवले तर आमदार, खासदार लोकप्रतिनिधींना लोक रस्त्यावर फिरु देणार नाहीत. समाजात दरी पाडण्याएवजी समाजाला न्याय देण्यासाठी काम करावे. नाही तर असा उद्रेक होईल की त्यावेळी आमचाही नाईलाज होईल. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्यावर विशेष अधिवेशन घ्यावे अशी मागणी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केली. खासदार संभाजी राजे व मी एकच असून दोघांचा हेतू मराठा समाजाला आरक्षण मिळावे असाआहे, असे त्यांनी स्पष्ट केले. 

सबंधित बातमी  ः # politics मला कोणी शिकवायची गरज नाही, संभाजीराजेचा पलटवार

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी खासदार छत्रपती संभाजी राजे महाराज यांनी उडी घेतली आहे. राज्यभर फिरुन ते समाजाच्या भावना एकून घेत आहेत. मराठा समाजाचे ज्या कारणाने 58 मोर्चे निघाले त्या कोपडी येथील निर्भया ताईच्या स्मृतीस्थळाला भेट देउन दोन दिवसापुर्वी अभिवादन केले. 16 जुन रोजी कोल्हापुर येथून मराठा आरक्षणाच्या मुद्यावर अंदोलन सुरु करणार असल्याचे जाहीर केलेले आहे. 

महाराष्ट्रातील मराठा समाज छत्रपती संभाजी राजे यांच्या पाठिशी आसल्याचे मराठा क्रांती मोर्चातील समन्वयकांनी जाहीर केलेले आहे. मराठा समाज खासदार संभाजी राजे व खासदार उदयनराजे यांना मानतो. त्या पाश्वभूमीवर सोमवारी खासदार संभाजीराजे महाराज व खासदार छत्रपती उदयनराजे यांची पुण्यातील भेटीकडे लक्ष लागले होते. 

भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना खासदार छत्रपती उदयनराजे भोसले चांगलेच कडाडले, ते म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही माझी आणि खासदार संभाजी राजे यांची भूमिका आहे. त्यामुळे आम्ही एकच आहोत. उगाच कोणी चुकीची माहिती पसरु नये

सबंधित बातमी  ः . # vinayk mete मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत सरकार काय करणार हे सांगावे ः विनायक मेटे

राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत भूमिका घेण्याची गरज आहे. मात्र एकदा निवडून आले की आमदार, खासदार आपनच राजे असल्यासारखे वागत आहेत. सभागृहात एक व बाहेर वेगळे बोलतात. सरकारमधील लोकांची मानसिकता आरक्षण देण्याची दिसत नाही. फक्त राजकारण करुन दोन समाजात फुट पाडण्याचे, दरी पाडण्याचे काम हे लोक करत आहेत.  एका समाजाला जवळ धरायचे, दसऱ्यावर अन्याय करायचा अशी या लोकांची भूमिका आहे. घटना 70 वर्षापुर्वी लिहीली, मग त्यावेळी आणि आता, काही फरक झालेला आहे की नाही याचा विचार कोण करणार, गरिबांना का वंचित ठेवता. आम्ही छत्रपती आहोत. आम्ही लोकांना, सर्व समाजाला न्याय देण्याचे काम करतो.  आता मराठा समाजाचा अंत संपल्यासारखे झाले आहे. तरुण पोरांचे भवितव्य अडचणीत आहे. त्यामुळे पोरं त्रासले आहेत. समाजाला, गरिब, वंचिताना वेठीस धरणाऱ्या, दिशाभूल करणाऱ्या लोकप्रतिनिधीं (आमदार, खासदार) निट वागले नाही तर गाडा, फोडा असे मी म्हणेन. 

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवा आणि काय होणार ते सांगा. नाही तर लोक एवढे त्रस्त आहेत की उद्रेक झाला तर लोकप्रत्निनिधींना बाहेर फिरणे अवघड होईल.  त्यावेळी आमचाही नाईलाज झालेला असेल. 16 जुन रोजाच्या अंदोलनाला माझा पाठिंबा आहे. लढा छत्रपती शिवाजी महाराजांच्या झेंड्याखाली सुरु आहे असे खासदार उदयनराजे भोसले यांनी सांगितले.  


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu