Ad Code

#pik vima शेतकऱ्यांची फसवणूक होऊ देणार नाही.संभाजीराजे दहातोंडे यांचा विमा कंपन्यांना इशारा


                                                             संभाजीराजे दहातोंडे पाटील 

अहमदनगर ः  शेतकऱ्यांनी गेल्यावर्षी खरिपात पीकविमा भरला होता. गेल्यावर्षी पावसाने व अन्य अनेक कारणाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आतातरी भरपाई मिळणे गरजेचे आहे. मात्र सबंधित कंपन्या नुकसान भरपाई द्यायला टाळत आहेत. आता हे खपवून घेतले जाणार नाही. जर तातडीने विम्याचा लाभ दिला नाही तर सबंधित कंपनीच्या कार्यालयात अंदोलन करु आणि वेळ प्रसंगी न्यायालयात जाऊ पण विमा कंपन्याच्या नाफेखोरीला आळा घालण्याचा खणखणीत इशारा शेतकरी मऱाठा महासंघाचे महाऱाष्ट्राचे अध्यक्ष संभाजीराजे दहातोंडे पाटील यांनी दिला आहे. दोन दिवसापुर्वीच त्यांनी कृषी राज्यमंत्री सत्यजीत कदम यांची भेट घेतली. 

संभाजी राजे दहातोंडे पाटील यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्रात  अनेक जिल्ह्यात गेल्यावर्षी शेतपिकांचे नुकसान झालेले  आहे आणि पीक विमा भरलेला आहे तरी विम्याचा लाभ देण्याला टाळाटाळ करत आहेत. काही जिल्ह्यात पीकविम्याचा लाभ दिला परंतू अनेक शेतकऱ्यांना त्यातून वंचित ठेवल्याचे पहायला मिळत आहे. ही शेतकऱ्याांची फसवणूक आहे. विमा कंपन्यानफेखोरीत गुंतल्या आहेत. सरकारही त्याकडे फारसे लक्ष देत नाही. 

हे ही वाचा ः आमदार बापाला लेक सासरी पाठवताना आश्रु आवरेनात

एकट्या अहमदनगकर जिल्ह्याचा विचार केला तर  खरिप 2020 या हंगामात 4 लाख 66 हजार कंपन्यांनी विविध पिकांचा 2 लाख 59 हजार 448 हेक्टरवर विमा उतरवलेला आहे. त्या पोटी शेतकऱ्यांकडून 148 कोटी रुपयांचा हप्ता भरलेला असून तेवढीच रक्कम शासनाकडून विमा कंपनीला गेली आहे. 745 कोटी रुपये यातून संरक्षित झाले आहेत. गेल्यावर्षी खरिपातील राज्यातील काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीकविमा कंपन्यांनी गतवर्षीच्या खरिपातील विम्याचा लाभ दिला आहे. नगर जिल्ह्यात मात्र याबाबत अजुन कोणताही निर्णय झालेला दिसत नाही. गेल्यावर्षी पावसामुळे तसेच नैसर्गिक कारणाने पीकांचे मोठे नुकसान झालेले असुन यावर्षीच्या खरिपाआधी पीक विम्याचा लाभ मिळणे गरजेचे असताना जाणीवपुर्वक दुर्लक्ष केले जात आहे. 

त्यामुळे लाभ का नाकारला जात आहे याची चौकशी करुन कारवाई होणे गरजे असताना सरकारी पातळीवरही दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून विमा हप्ता भरुन घेऊन विमा लाभ देण्यासाठी विलंब का लावला जात आहे याची चौकशी करुन सबंधित विमा कंपनी यांच्यावर कारवाई करण्याबाबत 14 जूनपर्यत कार्यावाही करावी अन्यथा 15 जून रोजी  मुंबई येथील कार्यालयात अंदोलन करुन शेतकरी मराठा महासंघाचे कार्यकर्ते कार्यालया बंद पाडतील असा खणखणीत इशारा संभाजी राजे दहातोंडे पाटील यांनी दिला आहे. याच मुद्यावर न्यायालयात जाणार असल्याचेही दहातोंडे पाटील म्हणाले. 


टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या

Close Menu