Ad Code

नगर जिल्ह्यात जिल्हा बॅंकेकडून साखर कारखान्यांना कर्जवाटप, संभाजी दहातोंडे यांची चौकशीची मागणी

  
संभाजीराजे दहातोंडे पाटील 

मुंबई ः  राज्यात नव्हे तर देशात सहकारात अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचा नावलौकीक आहे. मात्र येथे राजकीय लोक नियमबाह्य कामे करत असल्याचे दिसूनयेत आहे. अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने गेल्या पाच वर्षात साखर कारखान्यांना कर्जवाटप केलेले आहे. मात्र त्या कारखान्याकडे जेवढे कर्ज दिले तेवढी मालमत्ता व अथवा कर्जफेड करण्याची हमी देणारी कोणती बाब आहे का, यासह अन्य् बाबीची चौकशी करुन  कर्जवाटप केलेल्या कालावधीतील अध्यक्ष, उपाध्य्क्ष व संचालक मंडळावर कारवाई करावी अशी मागणी शेतकरी मराठा महासंघाचे अध्यक्ष संभाजीराजे दहातोंडे पाटील यांनी महाराष्ट्राचे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे निवेदन देऊन केली आहे. 

संभाजीराजे दहातोंडे पाटील यांनी दिलेल्या सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नगर जिल्ह्यातील अनेक साखर कारखान्यांकडे कर्जाचा बोजा थकलेला आहे. अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालक मंडळाने गेल्या पाच वर्षात साखऱ कारखान्यांना नियमबाह्य कर्जवाटप केले असल्याचे आमचे म्हणणे आहे. याची चौकशी होण गरजेचे आहे. हजारो कोटी रुपये राजकारणी लोकांच्या म्हणण्यानुसार साखर कारखान्यांना कसे दिले, एवढे पैसे देताना कुठले निकष लावले हे सांगणे गरजेचे आहे, मात्र तसे होत नाही. 

हे ही वाचा ः #pik vima शेतकऱ्यांची फसवणूक होऊ देणार नाही.संभाजीराजे दहातोंडे यांचा विमा कंपन्यांना इशारा

त्यामुळे आपनाकडे या निवेदनाव्दारे विनंती करण्यात येते की, अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेही अहमदनगर जिल्ह्यातील सामान्य नागरिक, शेतकऱ्यांची बॅंक आहे. बॅंकेने गेल्या पाच वर्षात नगर जिल्ह्यातील साखर कारखान्यांना दिलेल्या हजारो कोटी रुपयाचे कर्ज कसे दिले, ते नियमानुसार दिले का याची विशेष पथकामार्फत चौकशी करुन साखर कारखान्यांना केलेल्या हजारो कोटी रुपयाच्या कर्ज वाटपाबाबतची स्थिती लोकांसमोर जाहीर करावी आणि कर्जवाटपात तफावत आढळल्यास तत्कालीन अध्यक्ष, उपाध्यक्ष, व संचालक मंडळावर गुन्हे दाखखल करावेत. याबाबत दखल घेतली नाही तर जिल्हा सहकारी बॅंकेच्या कार्यालयात शेतकरी मराठा महासंघाचे कार्यकर्ते  अंदोलन करतील. 

नगर जिल्हा बॅंकेने साखर कारखान्याना दिलेल्या कर्जापोटी सातत्याने संचालक मंडळात मतभेद होत असल्याची माहिती आहे. त्यात आता संभाजीराजे दहातोंडे पाटील यांनी या कर्जाची चौकशी करण्याची मागणी केली असल्याने लोकांत चर्चेला वेग आला आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu