Ad Code

कोरोनानंतर चक्क किडनीला ब्लॅक फंगस ची बाधा, अहमदनगरमध्ये दुर्मिळ प्रकार, रुग्णांवर अवघड शस्त्रक्रिया करुन काढली किडनी


अहमदनगर,  ः  कोरोना झाल्यानंतर आणि त्यातून बरे झाल्यानंतर बऱ्याच रुग्णांना ब्लॅक फंगस (म्युकरमायकोसीस) च्या आजाराला समोरे जावे लागले आहे. या आजाराची नाक, डोळे, दात, मेंदुला लक्षणे दिसून येतात, बाधा होते. मात्र अहमदनगर मधील एका रुग्णांला कोरोना झाल्यानंतर चक्क किडणीत ब्लॅक फंगस (म्युकरमायकोसीस) झाल्याचा प्रकार उघडकीस आला. अहमदनगरमधील प्रसिद्ध मुत्रविकारतज्‍ज्ञ डॉ. आनंद काशीद यांनी त्या रुग्‍णांवर उपचार करत अवघड शस्त्रक्रिया करुन किडणी काढल्याने रुग्णाचे प्राण वाचले आहे. किडणीला म्युकरमायकोसीसची बाधा झाल्याचा प्रकार पहिल्यांदाच उघड झाल्याने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. 


कोरोनाची दुसरी लाट ओसरु लागत असताना, ब्लॅक फंगस म्हणजे म्युकरमायकोसिसने हातपाय पसरायला सुरुवात केली. यात अनेकांचे बळी देखील जात आहे. म्युकर म्हणजे ब्लॅक फंगसच्या रुग्णांना नाक, डोळे व मेंदूला लागण होते. मात्र किडनीला ब्लॅक फंगसची लागण होणे अत्यंत दुर्मिळ प्रकार अहमदनगरच्या महिलेला आढळून आला. सदर महिला कोरोना आजाराने बरी होऊन घरी परतल्या. मात्र त्यांना एक महिन्यानंतर ताप, थंडीचा त्रास होऊन पाठदुखी सुरु झाली. तपासणी केल्यानंतर त्यांना उजव्या किडनीमध्ये ब्लॅक फंगस असल्याचे निदर्शनास आले. डॉ. आनंद काशिद यांनी त्यांना त्वरीत रुग्णालयात भरती होण्याचा सल्ला दिला. रुग्ण पुण्याला जाऊन इतर डॉक्टरांचा सल्ला घेऊन पुन्हा नगरला रुग्णालयात दाखल झाला. 

मुत्रविकारतज्‍ज्ञ डॉ. आनंद काशीद यांनी तपासणी केल्यानंतर हा प्रकार उघड झाला. मात्र बाधेचे प्रमाण जास्ती असल्याने सबंधित रुग्णांची किडणी काढावी लागणार असल्याचे स्पष्ट झाले. सदर महिलेला कोरोनामुळे फुफ्फुसामध्ये इन्फेकशन होते. तर उजवी किडनी ब्लॅक फंगसने निकामी झाली होती. रुग्णाला मधुमेह असल्याने ही शस्त्रक्रिया करणे अधिक किचकट व गुंतागुंतीची होती. डॉ. आनंद काशिद, मधुमेह तज्ञ डॉ. अभिजीत शिंदे, फुफ्फुस विकार तज्ञ डॉ.निलेश परजने, भूल तज्ञ डॉ. पंकज वंजाळे, रेडिओलॉजिस्ट डॉ. सुशील नेमाणे यांनी प्रयत्न करुन शस्त्रक्रिया करुन रुग्णांचे प्राण वाचले. सबंधित रुग्णाची आर्थिक परिस्थिती हालाखिची असल्याने रुग्णालयाने शस्त्रक्रिया मोफत केली. केली. ‘‘ब्लॅक फंगस म्हणजे म्युकरमायकोसिसवर वेळेत उपचार झाल्यास रुग्णांचे जीव आणि किडनी दोन्ही वाचू शकतात. किडनीला ब्लॅक फंगसची लागण होणे भारतात नव्हे, तर संपुर्ण जगात बोटावर मोजण्या इतके रुग्ण आढळले आहे असे डाॅ. आनंद काशिद यांनी  सांगितले. 

---------


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu