Ad Code

शेतकरी पीकविम्यासाठी लढाई थांबणार नाही ः संभाजीराजे दहातोंडे पाटील, शेवगावला छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला महाभिषेक

शेवगाव ः छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला 101 वा महाभिषेक करताना संभाजीराजे दहातोंडे पाटील, रावसाहेब मरकड, चंद्रकांत लबडे व शिवभक्त कार्यकर्ते.  

by 👍 Chandrakant netke
 शेवगाव ः शेतकरी समाजाचा तारणहार आहे. छत्रपती शिवाजीराजे महाराज यांनी शेतकऱ्यांसाठी मोठे काम केले आहे. अलिकडच्या काळात नैसर्गिक संकटामुळे शेतकरी सतत अडचणीत येत आहे. पाऊस, गारपीट व अन्य कारणाने नुकसान झाले तर भरपाई मिळावी यासाठी पीक विमा योजना  राबवली जात आहे. मात्र गेल्या काही वर्षापासून विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांना भरपाई पुरेसी दिली जात नाही. वेगवेगळी कारणे ठेवुन वंचित ठेवले जात आहे. त्यामुळे आम्ही पीक विम्याचा लाभ मिळावा यासाठी लढा उभारला आहे. ही लढाई शेतकऱ्यांना लाभ मिळेपर्यत थांबणार नाही असा  इशारा शेतकरी मराठा महासंघाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष संभाजीराजे दहातोंडे पाटील यांनी दिला. 

वाचा ः नगर जिल्ह्यात जिल्हा बॅंकेकडून साखर कारखान्यांना कर्जवाटप, संभाजी दहातोंडे यांची चौकशीची मागणी

शेवगाव येथील शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला दर शुक्रवारी महाभिषेक करण्याचा उपक्रम शिवप्रेमी चंद्रकांत लबडे यांनी सुरु केला आहे. 101 वा महाभिषेक  शेतकरी मराठा महासंघाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष संभाजीराजे दहातोंडे पाटील यांच्या हस्ते झाला. यावेळी चंद्रकांत लबडे, रावसाहेब मरकड, ज्ञानेश्वर फसले, संतोष हंबर, शाम पवार, चंदु  लबडे, कृष्णा मडके, राम साळुंके, गणेश रांधवणे, डाॅ. निरज लांडे, मुन्ना बोरुडे, सुरज लांडे, राम सागडे, अभय गोरे, अविनाश देशमुख, डाॅ. देहाडराय,  सचिन नेव्हल, निलेश गटगळ, संदीप  गवांदे, दिनेश वाणी, रहित पायघन, दीपक उगले, लक्ष्मण सोळुंके, रोहीत पायघन आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.

वाचा ः #pik vima शेतकऱ्यांची फसवणूक होऊ देणार नाही.संभाजीराजे दहातोंडे यांचा विमा कंपन्यांना इशारा

 संभाजीराजे दहातोंडे पाटील म्हणाले, शेतकरी जगला तर समाज जगेल. मात्र तरिही शेतकऱ्यांची छऴवणूक सुरु आहे. अलिकड्च्या काळात नासर्गिक संकटाने पिचला आहे, पाऊस, गारपीट, वादळाने पीकांचे नुकसान होत आहे. कोरोना काळातही शेतऱ्यांना मोठ्या अडचणीला समारे जावे लागले आहे. गेल्यावर्षी नुकसान झालेल्या पिकांचा अजूनही विमा कंपन्यांनी पीकविमा दिला नाही. ही शेतकऱ्यांची पिळवणूकच आहे. सबंधित कंपन्यांना सरकारही काही बोलत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे हप्ते घेऊनही विमा न देणाऱ्या  कंपन्याच्या विरोधात मोहीम उघडली आहे. ही लढाई सुरुच राहिल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दर शुक्रवारी अभिषेक केला जातो.चंद्रकांत लबडे यांनी सुरु केलेला हा उपक्रम अभिमानास्पद आहे. शेवगाव तालुक्यातील खोट्या अॅट्रासिटीची गुन्हे मागे घेण्याची त्यांनी मागणी केली. 

 टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu