दोन दिवसापुर्वी राज्याचे उपमुख्यमंञी अजित पवार यांनी जिल्ह्याचा पिका संदर्भात आढावा घेतला परंतु जिल्ह्यात खताचा बफर स्टाॅक
करायचा असेल तर तो परळीतच केला जातो.आणि परिणामी जसजसा स्टाॅक संपत येतो त्यावेळेस माञ,आष्टी,पाटोदा आणि शिरूर हे तालुके
यामुळे वंचीत राहतात परिमाणी शेतक-यांचे नुकसान होत आहे.त्यामुळे जिल्ह्यात खताचा स्टाॅक सोबतच विक्रीसाठी काढावा अशी
मागणी आमदार सुरेश अण्णा धस यांनी केली.तसेच कृृृृषी दुकानदार हे खताच्या एमआरपी पेक्षा जास्त भावाने खताची विक्री करत असल्याच्या
या अगोदर तक्रारी आल्या आहेत.परंतु येथून पुढे जर परत कोणत्याही दुकानदारांची तक्रार जर जास्त दराने विक्री करत असेल तर आमच्या
हेल्पलाईन नंबर 8446124024 वर आपली तक्रार करावी असे त्या व्यापाऱ्यांची गय केली जाणार नसल्याचा इशाराही आ.सुरेश धस यांनी दिला.
बीड जिल्ह्यात खरिप पेरण्या करण्यासाठी शेतकऱ्यांनी तयारी करुन ठेवली आहे. काही भागात पेरण्या केलेल्या असुन कापसाची लागवडही झालेली
आहे. मात्र आता राहिलेल्या पेरण्या करायला पाऊस नसल्याने पेरणीचे काम रखडले आहे. अशातच कांद्याच्या बियाणांचीही तसेच खताची एमआरपी पेक्षा
जास्ती दराने विक्री केली जात आहे. हे शेतकऱ्यांची अडवणूक असून अडवणूक थांबली पाहिजे. जर कोणी जास्ती दराने विक्री करत असतील तर हा
प्रकार खपवून घेतला जाणार नाही असा खणखणीत इशारा आमदार सुरेश धस यांनी दिला आहे.
0 टिप्पण्या