Ad Code

# Maratha कोल्हापुरात मराठ्यांचा एल्गार, मुक अंदोलन सुरु, राज्याचे लागलेय लक्ष

                             

कोल्हापुर ः मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली अंदोलन झाले. अंदोलनात कोल्हापुरचे पालकमंत्री बंटी पाटील, बहुजन वंचित आघाडीचेे नेते माजी खासदार अॅड. प्रकाश आंबेडकर, मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, खासदार मंडलिक, खासदार धैर्यशिल माने, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह कोल्हापुर जिल्ह्यातील आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी आमि राज्यभरातून मराठा समाजाचे लोक सहभागी झाले आहेत.  कोल्हापुरात मराठा समाजाचा एल्गार सुरु झाला असून मराठा एकवटला असल्याचे पहायला मिळत आहे. श्रीमंत मालोजीराजे भोसलेही अंदोलनस्थळी आले आहेत.  आजच्या बुधवारच्या मुक अंदोलनानंतर पुढील अंदोलनाची दिशा काय असेल याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.  

मराठा समाजाचे आरक्षण न्यायालयाने रद्द केले. राज्य सरकारने न्यायालयात भूमिका चांगली मांडली नसल्याने हे आरक्षण रद्द झाले असल्याचे मराठा समाजाचे म्हणणे आहे. काहीही झाले तरी मराठा समाजातील गरिब कुटुंबातील तरुण आरक्षणापासून वंचित राहु नये यासाठी खासदार छत्रपती संभाजी महाराज यांनी राज्यात अंदोलन पुकारले आहे. खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनीही या अंदोलनाला पाठिंबा दिला आहे. 

मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही आमची भूमिका आहे. कोण कोणत्या पक्षाचा  हा विषय वेगळा आहे. आम्ही फक्त मराठा समाजाच्या हितासाठी एकत्र आलो आहोत. सर्व मराठा समाजाचे लोकप्रतिनिधी एकत्र आले तर निश्चितपणे आरक्षणाच प्रश्न सुटू शकतो. मराठा समाजाला नोकरी, शिक्षणात आरक्षण असणे  गरजेचे आहे. कारण चांगले गुणवान विद्यार्थी सुध्दा आरणक्ष नसल्याने नोकरी, उच्च शिक्षणापासून वंचित रहावे लागत आहेत. विधीमंडळातील सर्व सदस्यांनी अधिवेशनात मराठा आरक्षणाला पाठिंबा देतील. कोणताही आमदार वेगळी भूमिका घेणार नाही असी भूमिका येथे उपस्थित असलेल्या  आमदार, खासदारांनी मांडली आहे. 

मराठा समाजाचे कोल्हापुरात खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी अंदोलन पुकारल्यानंतर दोन दिवसापुर्वीच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी छत्रपती श्रीमंत मालोजीराजे भोसलेे यांची भेट घेतली होती. आजच्या बुधवारच्या अंजोलनात मालोजीराजेही अंदोलनस्थळी आले आहेत. आजच्या बुधवारच्या मुक अंदोलनानंतर पुढील अंदोलनाची दिशा काय असेल याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.  
टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu