Ad Code

फळपीकांचा विमा उतरवा, शेतकऱ्यांना कृषी विभागाचे अवाहन


                           

बीड ः प्रधानमंत्री फळपीक विमा योजना सुरु झाली आहे. कृषी विभागाने बीड जिल्ह्यात अधिसुचीत केलेल्या महसुल मंडळातील शेतकऱ्यांनी मृग बहारातील सिताफळ, डाळिंब, चिकु, मोसंबी, लिंबु, पेरु, संत्रा या फळपिकांचे  शेतकऱ्यांनी विमा उतरवावा असे अवाहन करण्यात आले आहे. 

फळपिकांचे अतीपाऊस, वादळ, गारपीट व इतर नैसर्गिक कारणाने नुकसान झाले तर शेतकऱ्यांना मदत  मिळावी यासाठी शासनाकडून मृग बहारासाठी पुर्नरचित हवामानावर आधारीत फळपीक विमा योजना राबवण्याला शासनाने मान्यता दिली आहे. योजनेत यंदा बीड जिल्ह्यासाठी संत्रा, मोसंबी,लिंबु, पेरु, सिताफळ, डाळिंब, चिकु, याफळपिकांचा समावेश आहे. योजनेत सहभागासाठी कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना सहभागी होता येईल. योजनेत सहभाग हा एच्छिक आहे. 

हे ही वाचा ः #Chandan farming जबरदस्त, गाडेकरांनी लावलेय सत्तावीस एकरावर चंदन

मात्र जे कर्जदार विहीत मुदतीत सहभागी न होण्याबाबत बॅंकाना कळवणार नाहीत असे शेतकऱी योजनेत सहभागी आहेत असे समजून सबंधित शेतकऱ्यांचा  विमा हप्ता  विहीत पद्धतीने कर्ज खात्यातून कपात केला जाईल. त्यासाठी अंतीम तारखेच्या  किमान सात दिवस आधी बॅकेला हप्ता न कापण्याबाबत कळवणे  गरजेचे  आहे. शेतकऱ्यांनी  आधारकार्ड, किंवा आधार नोंदणी प्रत, सातबारा, बॅकपासबुकीची प्रत, तसेच फळपिकांचे जियो टॅगिंग केलेले फोटो व अधिसुचित असल्याबाबतचे स्वयंघोषणापत्र, सादर करुन विमा  योजनेत सहभागी होण्याचे अवाहन कृषी विभागाने केले आहे. 

अशी आहे फळपीक विमा भरण्याची अंतीम तारीख 

- संत्रा, मोसंबी, पेरु, चिकु, लिंबू ः 30 जून,  - डाळिंब ः 14 जुलै, सिताफळ ः 31 जुलै

- हेक्टरी हप्ता ः संत्रा ः 4 हजार, मोसंबी ः 6 हजार रुपये, पेरु व चिकु प्रत्येकी ः 3 हजार रुपये, लिंबु7 हजार रुपये, डाळिंब 6 हजार 500 रुपये व सिताफळ 3 हजार 300 रुपये.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu