Ad Code

# गौरवगाथा ः तरुणाने हार नाही मानली, जिद्दीने सुरु केला व्यवसाय. ही गौरवगाथा तर वाचलीच पाहिजे.



दोघां भावंडानी आठरा वर्षापुर्वी तीन गाईंपासून सुरु केलेल्या दुध व्यवसाय तीस गाईपर्यत नेला. पारंपारिक गोठ्याएवजी तंत्रज्ञानाचा आधार घेऊन अत्याधूनिक व तांत्रिक बाबीनुसार गोठा उभारला. दुध व्यवसायाला मुरघास निर्मिती, विक्रीची जोड दिली. मुरघास तयार करण्यासाठी नवीन तंत्रज्ञान असलेले कुट्टी मशीन खरेदी केले. शेतीतही मजुरांएवजी यांत्रिकीकरणाचा वापरे करुन उत्पादनात वाढ केली. 

सोनगाव (ता. राहुरी) येथील राजेश बाळकृष्ण अंत्रे व गणेश बाळाकृष्ण अंत्रे ही दोघे भावंडे. राजेश यांचे पदवीत्तर, गणेश पदवीचे शिक्षण. शेती, व्यवसायाला आई लता यांचे पाठबळ. वडिलोपार्जीत पाच एकर बायागती शेती. वडीलांचा पारंपारिक दुध व्यवसाय. आठरा वर्षापुर्वी वडीलांचे निधन झाले. त्यावेळी तीन गाई होत्या. त्यावेळी आकरावीत शिकत होतो. पदवीचे शिक्षण पुर्ण केले आणि नोकरी न करता दोघां भावंडांनी 2013 साली शेती व वडीलांनी सुरु केलेला दुध व्यवसाय करुन तो वाढण्याचे ठरले. 

----

हे ही वाचा ः #kapus कापुस लागवडीबाबत कृषी विद्यापीठाने दिलाय सल्ला

----

मात्र अनेक अडचणी येत असल्याने त्यांनी हा व्यवसाय बंद करण्याचा निश्चय केला. दुसऱ्या व्यवसायाला काहीतरी अनुदान मिऴेल या आशेने बाभळेश्वर येथील कृषी विज्ञान केंद्रातील डाॅ. भास्कर गायकवाड यांच्याकडे गेलो. त्यांच्यासह संभाजीराव नालकर यांनी सांगितले. कोणताही व्यवसाय तोट्यात नसतो. तो आपन कसा करतो यावर अवंबून आहे. 

हे सांगतानाच पिढीजात दुध व्यवसाय पारंपारिक पद्धतीने नव्हे तर नवीन तंत्रज्ञानावर आधारित करण्याचा आणि त्याला जोड व्यवसाय करण्याचा सल्ला दिला. दोन वर्ष मार्गदर्शन केले. त्यानुसार मुक्त तांत्रिक आधारावर गोठा केला. तांत्रिक पद्धतीने व्यवस्थापन करत तीन गाईंच्या तीस गाई झाल्या. मुरघास तयार करण्याचा व्यवसाय सुरु केला.  



मुक्तगोठ्याची उभारणी 

💧 2013 साली तांत्रिक गोठ्याच्या उभारणीला सुरवात केली. त्यात बदल केला. पुर्वी शेडची उंची 8 फुट होती. मात्र उन्हाळ्यात उन्हाचा त्रास होत होता. हवा खेळती राहत नव्हती, त्यामुळे 12 फुट उंची घेतली. त्यातून हवा खेळती झाली. उन्हाचा त्रास कमी झाला.   प्रत्येक गाईंला 200 स्क्वेअर जागा लागेल असा आकारानुसार 60 बाय 80 आकाराचे दोन गोठ्याची उभारणी. 

💧 चारा वाया जाणार नाही, तसेच सातत्याने चारा वाया जाणार नाही. त्यानुसार गाईंना जमीन स्तरावर चारा खाता यावा यासाठी तांत्रिक पद्थतीने दिड बाय दोन व शंभर फुट लांबीची चारा गव्हाणी केली. गाय  चारा खाण्यासाठी व दुध काढणीच्या वेळी गाय शेण व गोमुत्र सोडते. शिवाय गाय सतत पाय हलवत असते हा निसर्गाचा नियम आहे. त्यामुळे तेथे खड्डे तयार होतात. असे खड्डे न पडण्यासाठी गाईं चारा खाण्याच्या, दुध काढण्याच्या निश्चित केलेल्या जागेवर 100 बाय 14 आकाराचा सिमेंट कोबा. 

💧 गोचिड निर्मुलानासाठी व पाण्याच्या टाकीला शेवाळ येऊ नये म्हणून आठवड्यातून एकदा पाण्याच्या व महिन्यातून एकदा चारा गव्हाणीला चुना मारतो. चाऱ्यातून जे प्रोटीन भेटत नाहीत ते खुराकातून देण्याच्या नियोजनातून गाईला सरसकट खुराक न देता त्या गाईंच्या दुध उत्पादन क्षमतेनुसार खुराक दिला जातो. वीस लिटर दुध देणाऱ्या गाईला सात किलो. 

---

हे ही वाचा ः kovid-19 आला ना जी आर ः चांगल्या कामाचा मिळणार पुरस्कार , गुणांकऩ मिळवणे महत्वाचे

---


💧 दर दिवसाला एका लिटरला पाच ग्रॅम मिनरल मिक्चरचा वापर. 

💧 हत्तीगवत, मेथी घास, मुरघास व गव्हाचा भुसा याच्या मिश्रणाचा चारा गाईंच्या वजनानुसार दिला जातो. पाचशे किलो वजनाच्या व वीस लिटर दुध देणाऱ्या गाईला दिवसभरात पंचवीस किलो हिरवा चारा व चार किलो वाळलेला चारा. गाभण काळात सकाळी -संध्याकाळी प्रत्येकी एक किलो खुराक. 

💧 गाईच्या प्रसुतीसाठी स्वतंत्र वार्ड. जन्मानंतर वासराला दहा मिनिटात नाळ बांधणे. तीन दिवस तीनवेळा इन्फेक्शन होउ नये म्हणून ओषधात बुडवणे. वासराला एका तासाच्या आत बाटलीने गाईचे दुध पाजले जाते. जन्मानंतर पुढील दोन महिने वजनाच्या दहा टक्के दुध पाजतो. पाचव्या दिवसापासून पुरेसे पाणी देतो. कालवडीसाठी दोन महिने स्वतंत्र व्यवस्था. वयाच्या पंधराव्या दिवसापासून वासरासाठी असलेली गोळीपेंड. 

💧  नगर जिल्ह्यातील दुध व्यवसायीक व अभ्यासक रवी नवले यांनी गेल्यावर्षी मार्च महिन्यात व्हाटसअॅप हिरकणी ग्रुप केला. त्यात राज्यातील शंभर दुध उत्पादकांसह गाईंच्या बाबत वेगवेगळा अभ्यास असलेले वीस पशुवैद्यकीय डाॅक्टर आहेत. गेल्यावर्षी आॅनलाईन प्रशिक्षण सुरु केले. आतापर्यत 40 वेळा आॅनलाईन प्रशिक्षनातून दर्जेदार सिमेन्सची माहिती मिळाली. 

💧 हवे ते सिमेन्स मिळत नसल्याने ते अपल्याकडे वेळेत उपलब्ध व्हावेत यासाठी स्वःखर्चाने सिमेन्स नायट्रोजन कॅन खरेदी केला. गाईंच्या लागवडीच्या, वासराच्या जन्माच्या, लसीकरणाच्या पाॅवर गोठा अॅपमध्ये नोंद केली जाते. 

💧 वर्षातून दोनदा लाळ्या खुरकुताचे लसीकरण, नुकसान टाळण्यासाठी वर्षातून एकदा रक्ताची तपासणी गोचीड तपाची लसीकरण.  भविष्यातील गर्भपाताचा धोका टाळण्यासाठी चार ते पाच महिने वयाच्या कालवडीसाठी एकदाच होणारे ब्रुसेलाचे लसीकरण.



मुरघास निर्मिती 

सहा वर्षापर्वी परिसरातील लोकांनी  एकत्र येऊन बचत गट केला होता.  चारा कुट्टीसाठी आठ वर्षापुर्वी मशीन खरेदी. त्याच आधारा सहा वर्षापासून मुरघास निर्मिती. दिवसभरात सुमारे 75 ते 80 टनाची कुट्टी करणाऱ्या मशीनची चार वर्षापुर्वी खरेदी. त्याच वेळी टॅक्टरचीही खरेदी. स्वतः मुरघास तयाक केल्यानंतर लोक पाहायला येऊ लागले. त्यानंतर मशीन खरेदी. आता लोकांनाही बनवून देऊ लागलो. सध्या वर्षभरात सहाशे ते सातशे टन मुरघासाची विक्री करतात. त्यासाठी मशीन व अन्य कामासाठी वीस लोकांना रोजगारही उपलब्ध झाला आहे. त्यासाठी गरजेनुसार लोकांकडून मकाची खरेदी केली जाते. 

----------------

अपयशाने खचलो नाही... 

दहा वर्षापुर्वी 100 देशी कोंबड्याचा एक वर्ष प्रयोग. त्यानंतर ब्रायलरचे एक वर्ष प्रयोग केला. दोन्हीतही अपयश आले. त्यानंतर सहा महिने ससेपालन केले. त्यातही तोटाच झाला. त्यानंतर गांडूळ खत प्रकल्प केला. महिन्याला चार टन खत तयार केले. मात्र त्यालाही त्या काळात फारसी मागणी रहिली नाही. कुटूंबातील लोक नाराज झाले. त्यानंतर हे सर्व बंद करुन त्याकाळात नव्याने ठिंबकची मोहिम सुरु झाली. मात्र आम्ही दहा तरुणांनी एकत्र येऊन इतर शेतकऱ्यांच्या शेतात ठिंबक सिंचन संच जोडणीचे कामे सुरु केले. वर्षभर केल्यानंतर बाभळेश्वर कृषी विज्ञान केंद्राशी संपर्क आला आणि आयुष्याला वळण मिळाले. शेवटी पारंपारिक पद्धतीने न करता तांत्रिक आधारावर आणि कष्ट कमी करण्यासाठीचे तंत्र वापरुन दुध व्यवसाय करण्याचा निश्चय केला. त्यात काळात मक्याचे हायड्रोपोनिक चाऱ्याची वर्षभर निर्मिती केली. जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन विभागाचा आदर्श गोपालक, बाभळेश्वर कृषी विज्ञान केंद्राने आदर्श दुध उत्पादक शेतकरी पुरस्कारने गौरव केला आहे. 



ठिंबक सिंचनवर चारा उत्पादन 

गणेश अंत्रे यांना वडिलोपार्जित पाच एकर शेती. त्यात मुरघासासाठी एका मका, दोन एकरावर मेथी घास, एक एकरावर संकरित ज्वारी (मेगा स्वीट) लागवड. एक एकरावर भुसार पिकांचे उत्पादन. सहा वर्षापासून ठिंबक व तुषार सिंचनचा वापर करुन चारा उत्पादन करतात. मजुर टंचाई कमी करण्यासाठी शेतात टॅक्टर, रोटाव्हेटर, नांगर, पेरणीयंत्राचाही प्रामुख्याने वापर करतात. गाईंच्या मुक्त गोठ्यातील दर तीन दिवसाला शेणखताची उचलणी. त्यासाठी टॅक्टरला जोडणारे खत भरणीयंत्र स्थानिक पातळीवर तयार करुन घेतले. वर्षभरात चाळीस टन खताची उपलब्धता. वीस टन चाऱ्यासाठी स्वतःच्या शेतीत वापर. वीस टन खताची शेतकऱ्यांना विक्री करतात.  

------

संपर्क ः गणेश अंत्रे ः 9763042470


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu