Ad Code

#धक्कादायक, पाच वर्षाच्या मुलीला म्युकरमाकोसीस


 कोपरगाव ः कोरोनाची बाधा होण्याचे प्रमाण कमी होत असले तरी कोरोना संपलेला नाही. त्यामुळे लोकांनी बेफीकीर होऊ नये असे आरोग्य विभाग, प्रशासन अवाहन करत आहे. कोरोना झालेल्या काही लोकांना काळ्या बुरशीचा म्युकर मायकोसीस चा आजार झाला. मात्र अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील राहिवासी असलेले परंतू शिर्डी येथे राहत असलेल्या एका कुटूंबातील पाच वर्षाच्या  मुलीला म्युकरमायकोकीस झाल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. त्यामुळे केवळ मोठ्या माणसांनाच नाही तर लहान मुलांनाही म्युकरमाकोसीस चा धोका असल्याचे दिसून येत आहे. 


गेल्या दोन महिन्यापासून कोरोनाची मोठी लाट आली होती. अनेकांना कोरोनाची बाधा झाली. अनेक कुटूबे यातून उद्वस्त झाली. वयस्क व्यक्तींना कोरोना होऊन गेल्यानंतर काहींनी काळ्या बुरशीचा असलेला म्युकरमायकोसीसचा आजार झाला. त्यामुळे लोकांनी  काळजी घेण्याचे प्रशासन आणि आरोग्य विभाग अवाहन करत आहे. कोरोनाची बाधा कमी होण्यासाठी लाॅकडाऊन केले होते.

वाचा ः # milk दुध दरासाठी गुरुवारी महाराष्ट्रात अंदोलन 

आठ दिवसापासून कोरोनाची बाधा होण्याचे प्रमाण कमी झाल्याने लाॅकडाऊन कमी केले तर काही ठिकाणी लाॅकडाऊन पुर्णतः काढण्यात आले. मात्र अजून कोरोना गेलेला नाही. तिसऱ्या लाटेचा धोका सांगितलेला आहे. त्यामुळे काळजी घ्याली असे अवाहन करतानाच लहान मुलांना बाधा होण्याचे प्रमाण अधिक असल्याचे सांगितले जात आहे. त्यातच नगर जिल्ह्यातील कोपरगाव तालु्क्यातील राहिवासी व शिर्डी राहत असलेल्या  एका कुटूंबातील पाच वर्षाच्या मुलीला काळ्या बुरशीचा म्युकरमायकोसीस झाल्याचे उघड झाले आहे. 

सबंधित मुलीची कोरोना चाचणी निगेटीव्ह आली. मात्र तिला अत्यवस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात दाखल केले. नंतर त्या मुलीचा चेहरा, डोळे आणि अंगावर सुज आल्याचे आढळून  आले. परिस्थिती हलाखिची असल्याने लोणी येथील रुग्णालयात दाखल केल्याचे सांगितले जात आहे. मात्र एवढ्या कमी वयात म्युकरमायकोसीस झाल्याचे आढळून आल्याने बालकांनाही धोका कायम असल्याचे दिसून येत आहे. 


 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu