पुणे ः कंत्राटी का होईना पण नोकरी असल्याने घरातील प्रत्येकांना आमच्यााकडून काही तरी आधार मिळावा ही आशा. काही वर्ष नोकरी केली, पण आता एन कोरोनाच संकटाच्या काळात योजना बंद पडली आणि आमचीही नोकरी गेली. कोरोनाचे संकट आमच्याही कुटूंबापर्यत पोचले. पैशाची गरज पडली. पण काय करणार, नोकरी गेलीय, उपासमारीची वेळ आली. काय करणार इच्छा असूनही संकटकाळी मदत करता आली नाही. राज्यभर एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम बंद झाला आणि कंत्री कामगार म्हणून काम करत असलेल्या अनेकांची नोकरी गेलीय, त्यामुळे ते कामगार हतबलता व्यक्त करत आहेत.
ग्रामीण खेड्याच्या आणि तेथील शेतकऱ्यांच्या विकासासाठी केंद्र व
राज्य सरकारच्या निधीतून कृषी विभागामार्फत राबवण्यात येत असलेल्या
‘एकात्मिक पाणलोट व्यवस्थतापन कार्यक्रम’ (आयडब्लुएमपी) यावर्षीच्या मार्च
महिन्यापासून बंद केला आहे. केंद्र सरकारकडून नव्या वर्षासाठी निधी मंजुर
केला नसल्याने हा कार्यक्रम बंद करण्यात येत असल्याचे कृषी आयुक्तांनी
जिल्हाधिकारी व जिल्हास्तरावरील पाणलोट च्या जिल्हा कार्यक्रम अधिकाऱ्यांना
कळवले आहे.
------
-------
एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रम बंद झाल्याने या उपक्रमात
कंत्राटी पदावर काम करणारे राज्यातील शेकडो कर्मचाऱ्यावर एन कोरोनाच्या
संकटाच्या काळात उपासमारीची वेळ आली आहे. सध्याची परिस्थती पाहता
कार्यक्रमाला मुदतवाढ मिळावी अशी विनंती जिल्हा पातळीवरील कृषी विभागाच्या
वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वरिष्ठांना केली, मात्र अजून त्याची दखल घेतली
नसल्याचे दिसत आहे. शेतकरी, महिला बचतगटांनाही याचा फटका बसणार आहे.
राज्यात ४ हजार ५०० कंत्राटी कर्मचारी भरती
केले. दरवर्षी एप्रिलमध्ये आकरा महिन्याचा करार होई, परंतू ज्या तालुक्याचा
उपक्रमाचा कालावधी संपला तेथील बरेच कर्मचारी २०१६, २०१७ मध्ये कालावधी
संपल्यानंतर कमी केले असले तरी आताही सध्या राज्यात शेकडोकंत्राटी कर्मचारी
काम करत होते. मिळालेल्या माहितीनुसार २०२२ पर्यत हा कार्यक्रम सुरु
राहणार होता. मात्र यावर्षी नव्याने केंद्र सरकारकडून निधी मंजुर झाला
नाही. त्यामुळे योजना बंद होत असल्याचे जिल्हास्तरावर कळवलेय. मात्र अचानक कोरोना संकटाच्या काळात नोकरी गेल्याने
अनेक कर्मचाऱ्यावर उपासमारीची वेळ आली. मुदतवाढ देण्याची मागणी सुरु
असल्याचे संघटनेचे विदर्भातील अध्यक्ष प्रशांत पवार यांनी सांगितले.
-------
--------
शेतकरी, कष्टकरी, कामगार आणि गावखेड्याच्या विकासासाठी असलेल्या
एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रम बंद झाल्याने त्यात अनेक वर्षापासून काम
करणारे कंत्राटी कर्मचाऱ्यावर एन संकटाच्या काळात उपासमारीची वेळ आली आहे.
त्यामुळे मुदतवाढ मिळावी यासाठी पत्रव्यवहार सुरु आहे. शिवाय कृषीच्या अन्य
उपक्रमात अथवा नव्याने येत असलेल्या जलसंधारणाशी सबंधित जलजीवन मिशन
कार्यक्रमात प्राधान्याने सामावून घेण्याबाबातही मागणी केली आहे. असे संघटनेचे अध्यक्ष बाबासाहेब कोकाटे यांनी सांगितले आहे.
0 टिप्पण्या