पुणे : सततच्या प्रतिक्षेनंतर मोसमी पाऊस अखेर महाराष्ट्रातील बऱ्याच भागात दाखल झाला आहे. आज रविवारी मराठवाड्यातील काही जिल्ह्यासह महाराष्ट्रातील अलिबाग, सातारा, पुणे भागात मोसमी पाऊस पोचला. देशात पश्चिम बंगाल, ईशान्य भारतातील सिक्कीमपर्यत हा पाऊस पोचला असल्याचे हवामान खात्याने सांगितले. दरम्याण चोवीस तासाच महाराष्ट्रातील अनेक भागात पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.
हे ही वाचा ः # शेतकऱ्याांना सल्ला ः भुईमुग, मुग, उडीद, मका, बाजरीसाठी आहेत हे वान फायद्याचे
पावसाळा सुरु झाला की साधारण 7 जुनला पाऊस सुरुच होतो असा जुन्या काळात कयास होता. त्याच अनुषंगा खरिपातील पेरणीची तयारी केली जायची. मोसमी पावसाचा हा सामान्य जाणकार शेतकऱ्यांचा अंदाजही खरा ठरायचा. आलिकडच्या काही वर्षात मात्र हे अंदाज चुकु लागले आहेत.
यावर्षी मोसमी पाऊस २१ मे रोजी अंदमान बेटांवर यंदा एक दिवस उशिराने दाखल झालेल्या मॉन्सूनचे केरळातील आगमन लांबले होते. त्यानंतर नियमित वेळेच्या (१ जून) दोन दिवस उशिराने दक्षिण केरळात दाखल झाला. अरबी समुद्राकडून वेगाने वाटचाल करत दोनच दिवसांत मॉन्सूनने महाराष्ट्रापर्यंत मजल मारली.
हे ही वाचा ः शेतकऱ्यांना विद्यापाठाचा सल्ला ः तुर, सोयाबीनचे हे वाण पेरण्याचे अवाहन
नेहमीपेक्षा चार दिवस आधीच म्हणजे आज रविवारी पुण्यात हजेरी लावली. मुंबईत मात्र अद्यापही मॉन्सून दाखल झालेला नाही. पुण्यासह मुंबईत मॉन्सून साधारणतः १० जून रोजी दाखल होतो असा अलिकडचा अनुभव आहे, देशातही रविवारी कर्नाटक, तमिळनाडू, महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, सिक्कीम पर्यत मोसमी पाऊस पोचला आहे. मोसमी पाऊस दाखल होत असल्याच्या हवामान खात्याच्या वार्तेने शेतकरी खुश झाले आहेत. आता बहूतांश ठिकाणी पेरणीची तयारी सुरु आहे.
-----------
0 टिप्पण्या