Ad Code

तरुणाने सुरु केला व्यवसाय सुरु, संघर्षावर मात, नागरिकांकडून कौतुक

शिवम ग्राफीक्सचे उदघाटन करताना मनोज जरांगे पाटील व मान्यवर 

शहागड (ता. अंबड) ः कोरोना संसर्गामुळे अनेकांचे  रोजगार गेले. नोकऱ्याही अडचणीत आल्या, त्यामुळे नोकरीच्या मागे न  जाता स्वतःचा रोजगार सुरु करण्याचा निश्चय केला. अनेक अडचणीवर मात करत शहागड (ता. अंबड, जि. जालना) येथील सोमनाथ पाराजी मुळीक या तरुणाने शिवम ग्राफिक्स नावाचा  डिजीटलचा व्यवसाय सुरु केला आहे. शिबवा संघटनेचे संस्थापक आणि समाजीक चळवळीतील प्रसिद्ध कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते  या व्यवसायाचे उदघाटन झाले आहे. 

शहागड (अंकुशनगर) येथील शेतकरी कुटूंबातील सोमनाथ पाराजी मुळीक या तरुणांची घरची परिस्थिती जेमतेम. आटपाडी (जि. सांगली) येथे डीएडचे शिक्षण घेतले.  मात्र नोकरी मिळाली नाही. त्यामुळे त्याने तेथेच राहून मित्र गणेश टकले यांच्याकडे ग्राफीक्सचे शिक्षण घेतले. नोकरी मिळण्याची आशा मावळल्यानंतर स्वतःचा ग्राफीक्सचा व्यवसाय सुरु करण्याचा निश्चय केला खरा, पण आर्थिक परिस्थितीमुळे अनेक अडचणीला तोडं द्याावे लागले. मात्र मित्रांच्या मदतीने अखेर स्वतःचा ग्राफीक्सचा व्यवसाय सुरु केला. 

गुरुवारी दि. 17 जून रोजी शहागड (पैठण फाटा) येथे शिवम ग्राफीक्स या दुकानाचा शिबवा संघटनेचे संस्थापक आणि समाजीक चळवळीतील प्रसिद्ध कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते  उदघाटन केले. गोरी-गंधारीचे. ऍड. नारायण खरात, उपसरंपच श्री. संदीप आण्णा तिळवणे, माजी सरपंच श्री. रमेश भाऊ निवारे,  श्री. भागवत तात्या खरात, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे व्यवस्थापक श्री. येटाळे साहेब,  श्री. पांडुरंग आदमाने, वाळकेश्वरचे माजी सरपंच श्री. मधु मापारी,, श्री विनायक नाना मचे, श्री. ह. भ. प. लाड सर, श्री. बयाजी आण्णा जायभाये, श्री. संजय दादा  कटारे, साष्ट पिंपळगावचे माजी सरपंच श्री. शहादेव औटे,   श्री. दिनकर सकुंडे, श्री. बाबुराव मळेकर, श्री. महादेव मुळीक, श्री. मोती बापू मापारी, श्री. भागवत नाना जाधव,  श्री. भगवान मोहिते, श्री. मन्सूर शेख, ऍड. सतिश मगरे, श्री. कृषणा बजगुडे  यांच्यासह परिसरातील प्रतिष्ठित उपस्थित होते. 

शिवम ग्राफिक्स मधून नागरिकांना मोफक दरात लेझर कटींग, रेडियम वर्क, एलईडी बोर्ड, एक्रेलिक बोर्ड, डिजीटल बॅनर, बलून डेकोरेशन, बिल्डींग अक्षरे, नेम प्लेट, ग्लास इचिंग फिल्म आदी सुविधा असतील. सोमनाथ मुळीक या तरुणांने अडचणीवर मात करत स्वतःचा व्यवसाय सुरु केल्याने अनेकांनी कौतुक केले आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu