Ad Code

आमदार बापाला लेक सासरी पाठवताना आश्रु आवरेनात


पुणे ः बेटी अन धनाची पेटी अशी ग्रामीण भागात जुनी म्हण आहे. लेकीवर बापाचा मोठा जीव असल्याचे अनेक उदाहरणे आपन पाहिले आहेत. असा एक अनुभव महाराष्ट्राने घेतला आहे. राजकारणात नावलौकीक आणि तेवढेच डॅशिंग आमदार महेशदादा लांडगे  यांची ओळख. त्यांना लेक सासरी  त्यांना आश्रु अनावर झाले. त्यांच्या भावनेचा व्हिडीओ त्याची भावना मांडतोय. 

 भोसरीचे आमदार महेशदादा लांडगे यांच्या लेकीबद्दल भावना त्यांच्या शब्दात व्यक्त करतानाचा व्हिडीओ व्हायरल झालाय. लेकीला सासरी पाठवताना ते मुलीला समाजाच्या कल्याणासाठीचा संदेश देताना ते दिसत आहेत. पुण्यातील भोसरीचे डॅशिंग आणि तेवढेच लोकांसाठी काम करणारे लोकप्रिय आमदार महेश दादा लांडगे यांच्या मुलीचा काही दिवसापुर्वी विवाह झाला. खरं तर प्रत्येक बाप लेकीला जावीपाड जपतो. बापाचे लेकीवर किती जीव असतो हे आमदार महेश दादा लांडगे यांनी त्यांच्याच शब्दात व्यक्त केलेल्या भावनातून दिसतोय. 

आठरा तासात युटूबवर तब्बल 30 हजारापेक्षा अधिक लोकांनी व्हिडीओ पाहून कमेंट केल्या आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओत आमदार महेशदादा लांडगे यांनी काय व्यक्त केल्यात लेकीबद्दलच्या भावना त्यांच्याच शब्दात 

मुलीचा बाप होण्याचं भाग्य लाभणं खरच परमेश्वराचा सर्वात आनंददायी आशिर्वाद आहे. त्याच आशिर्वादानंतर त्या बापाच्या काळजाचा ठाव कोणी घेतलाय का आजवर. कारण जो परमेश्वर ज्या बापाच्या पदरात सोन्याची परी टाकतो तो बाप भाग्यवान असतो. लोक मला प्रमाने दादा म्हणतात. सहाजीक आहे, मी राजकारणात आहे. आमदार आहे, माझं अख्खं आयुष्य समर्पित केलेय समाजाला. तरीही पण मी एका मुलीचा बाप आहे. माझी परी, माझं बाळ साक्षी. कामाच्या व्यापामुळे मी आजवर तीला आजवर जास्त वेळ देऊ शकलो नाही. पण ती माझं काळीज आहे. साधं खरचटंल तरी काळजी तुटून पडायचं. कायम हसणारे तुझे दोन डोळे बघितले की सुखाने न्हावून निघतो मी. तुझ्या हसऱ्या डोळ्यात स्वर्ग दिसतो. एका बापाला अजून काय हवं आहे. तुला नसतं पाहिलं तरी सारं दुखः अडचणी भुर्रकन उडून जातात. आम्हा लांडगे कुटूंबियांनी खरंच काही पुण्यकर्म केले असतील म्हणून तु माझ्या आणि तुझ्या लाडक्या आईच्या  पोटी जन्म घेतला. साक्षी तु आज नव्या आयुष्याला सुरवात केलीय. घरातील सगळेच फार तुझ्यावर जीवापाड प्रेम करतात. तु तशी खुप समजुतदार आहेस. पण तुला एक सांगू का बाळा. जमेल तसं शिकत रहा दुनियाच्या शाळेत. व्यवहाराच्या आडव्या उभ्या धाग्यांबरोबर गुंफत रहा, नाविन्यपुर्ण काही तरी. पणे सगळं करत असताना तुझं स्वतःच फुलणं ध्यानात ठेव. फुलणं प्रत्येक फुलांचा अधिकार आहे आणि फुलवणं माती मातीचं कर्तव्य आहे. अंधाराला घाबरवणं सोपं असंत बाळा, पण दिवा लावणं अवघड असते. जे संस्कार आई, बाबा, काका, काकू आम्ही सर्वानी दिलेत त्या  संस्काराचं जतन कर. हे काम माझं तिच्या या पुढच्या आयुष्यात करेल हा विश्वास आहे. मंदिराप्रमाणे मनाचे कवाडं खुली ठेवं. भोंडवे परिवार तुला फुलासारखा जपेल. तु सर्वाची काळजी घेशील यात शंका नाही. बाळा तुझं कन्यादान करताना  उर भरुन आला. आनंदाच्या, दुखाःच्या, प्रेमाच्या, विहराच्या सर्वच्या सर्व भावना एकवटून आल्यात, पुन्हा एकदा कळालं मुलीचा बाप होणं काय असतं. तु तुझ्या नवजीवनाचं नंदनवन करशील याची मला खात्री आहे. तुझा हा बाप कुठेही असला तरी तो तुझ्यासोबत आहे हे लक्षात ठेव. सुखी रहा....

आमदार महेश दादा लांडगे यांच्या या भावना एकनाऱ्याच्याही डोळ्यात पाणी तरळल्याशिवाय राहत नाहीत. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu