Ad Code

एक तरुण पुढे आला, त्याच्या प्रयत्नातून आदीवासी शेतकऱ्यांनी कमालच केली,
जिद्दीच्या जोरावर घवघवीत यश मिळवता येते. हे आपन सातत्याने अनुभवले आहे,. असाच प्रत्येय अकोले (जि. अहमदनगर) तालुक्यातील अतीदुर्गम असलेल्या म्हाळुंगी येथील युरवाज डामसे या आदीवासी तरुणाच्या बाबत आला आहे. या तरुणाने आदीवासी शेतकरी एकत्र करुन म्हाळुंगी परिसर शेतकरी गटाची स्थापना केली. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करत शेडनेट उभारणी करत तसेच गटाच्या माध्यमातून भाजीपाला उत्पादन आणि विक्री व्यवस्था उभी केली. येथील पंचवीस शेतकरी शंभर एकरावर भाजीपाला उत्पादन घेतात. एकमेका सहाय्य करु या धर्तीवर काम करत गटाने तीन वर्षात चांगला नावलौकीक मिळवला आहे. यंदा गटाचे रुपांतर आता शेतकरी कंपनीत केले आहे. 


अकोले तालुक्यातील पश्चिम भागात बहूतांश आदीवासी शेतकरी. या भागात पावसाचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे भाताचे पीक असते, मात्र म्हाळुंगी गावाच्या परिसरात भात शेती अल्प असून बाजरी, हरभऱा, टोमॅटो, गहू, सोयाबीन ही व इतर पीके घेतली जातात. मात्र शेतकरी एकत्र येऊन गट तयार करण्याला कारणीभुत ठरला येथील युवक युवराज डामसे. युवराजने 2014 साली पदवीचे शिक्षण घेतल्यानंतर गावी जाऊन वीस गुंठे क्षेत्रावर स्वतः शेडनेट तयार केले व त्यात सीमला मिरची व अन्य भाजीपाल्याचे उत्पादन घेतले. मात्र भाजीपाल्याची विक्री व्यवस्था साधता आली नाही. त्यात नुकसान झाले. त्यामुळे हतबल युवराजने कृषी विभागात जाऊन त्यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न केला. 


कृषी विभागाच्या मदतीने शेतकरी गट निर्माण केल्यावर युवराज डामसे या तरुणांच्या प्रयत्नातून काही शेतकऱ्यांनी भाजीपाला उत्पादन सुरु केले.  कृषी विभागाच्या अवाहनानंतर आणि युवराज डामसे यांच्या पुढाकारातून त्यांच्यासह संदीप उघडे, शिवाजी अस्वले, महादु अस्वले, दत्तु अस्वले, विजय अस्वले, राजेंद्र अस्वले, बारकु उघडे, नाना नाडेकर, रोहिदास उघडे, मधुकर डामसे, रामु डामसे, लक्ष्मण डामसे, रोहिदास डामसे, आनंदा डामसे, निलेश डामसे, धनाजी अस्वली, आनंदा डामसे, नामदेव डामसे, रघुनाथ नाडेकर, रामदास डामसे, विठ्ठल डामसे, भरत डामसे, रामनाथ डामसे, केरु डामसे या पंचवीस शेतकऱ्यांनी एकत्र येऊन 2018 शेतकरी गटाची स्थापना केली.  या गटाची त्याचवर्षी या गटाची कृषी विभागाच्या मदतीने असलेल्या आदीवासी विकास योजनेतील गटशेती प्रोत्साहन व सबलीकरण योजनेसाठी निवड झाली आणि म्हाळुंगी परिसर शेतकरी गटाला बळकटी मिळाली. 


गटशेती बळकटीकरण योजनेतुन म्हाळुंगी परिसर शेतकरी गटातील पंचवीस शेतकऱ्यांनी पंचवीस एकरावर शेडनेट उभारले. त्यासाठी कृषी विभागाने पन्नास टक्के, 25 टक्के आदीवासी विभाग व 25 टक्के शेतकरी वाटा.  एका एकर शेडनेट साधारण पंचवीस ते सव्वीस लाख खर्च येत असल्याने शेतकरी वाटा सहा लाखापेक्षा अधिक होता. आदीवासी शेतकरी गरिब परिस्थितीमधील असल्याने या शेतकऱ्यांनी शेडनेट उभारणीत एकमेका सहाय्य करत उभारणी केली. एका शेतकऱ्यांचे सरकारी अनुदान जमा झाल्यानंतर ते पैसै दुसऱ्या शेतकऱ्याला देत पुढील शेडनेट उभारणीला सुरवात करत. असे करत पंचवीस एकरावरील शेडनेट उभारणी पुर्ण करत वेगळा आदर्श निर्माण केला. साधारण सात कोटापेक्षा रक्कम यावर खर्च झाली. 
  
म्हाळुंगी परिसरत शेतकरी गटातील पंचवीस सदस्य पंचवीस एकर शेडनेटमध्ये तसेच 75 एकर खुल्या क्षेत्रावर सलगपणे तीन वर्षापासून विविध भाजीपाला उत्पादन घेत आहेत. या शेतकऱ्यांनी विक्री व्यवस्था उभी केल्याने अडचणीवर मात करता आली आहे.  पहिल्यावर्षी गटातील सर्व सदस्यांनी काकडी व सिमला मिरचीची लागवड केली. एकाचवेळी सर्व सदस्यांनी एकच प्रकारचा भाजीपाला घेतल्याने तो विक्री करणे सोपे झाले. चार दिवसाला साधारण दहा टन भाजीपाला मुंबई, पुणे, अहमदाबादला विक्रीसाठी पाठवला जात होता. काही प्रमाणात स्थानिक पातळीवर विक्री. विक्री केलेले पैसे थेट गटाच्या खात्यावर जमा होऊ लागले. सलग दोन-आडीच वर्ष काकडी व सिमला मिरचीचे उत्पादन घेतले.  सध्या या शेतकऱ्यांनी फरस वालची लागवड केलेली असून मुंबई, पुण्यात विक्री केली जाते. मात्र तोडणी वाढल्यानंतर पुन्हा अहमदाबादला विक्री करणार आहेत.   


लाॅकडाऊनच्या काळात या शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. या काळातही शेतकऱ्यांनी साधारण सहा महिने मुंबईत जाऊन भाजीपाल्याच्या थेट विक्रीचा प्रयत्न केला. ताजा भाजीपाला असल्याने मागणी चांगली होती. दरही चांगला मिळत होता. मात्र तेथील स्थानिक विक्रेते, परप्रातीयांनी भाजीपाला विक्री विरोध केला. अधिक त्रास वाढल्याने मुंबईतील थेट विक्री बंद करावी लागली.  आदीवासी भागातील शेतकरी म्हाळुंगी परिसर शेतकरी गटाच्या माध्यमातून पहिल्यांदाच यांत्रीकरण, ठिंबक सिंचनचा वापर करु लागले आहेत. 

गटशेती सबलीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यातील गटासाठीच्या सामुहीक लाभातून ट्रॅक्टर, रोटावेटर, पाॅवटर टिलर, बेड व सरी पाडण्याचे यंत्र, पेरणीयंत्र, नांगर, ट्राॅली, फळे भाजीपाला तोडणीसाठी प्लास्टीकचे कॅरेट, पाण्यासाठी टॅंकर घेतला.  सर्वच्या सर्व शंभर एकर क्षेत्रावर पाण्यासाठी ठिंबकचा वापर केला जात आहे. यांत्रिकरणाच्या औजारे बॅंकेमुळे शेती करण्याला सोपे झाले आहे. गटातील शेतकऱ्यांना इतरापेक्षा कमी पैसे घेतो. आलेल्या पैशाची गटासाठी बचत करतात.  स्थानिक पातळीवर तसेच शेतकऱ्यांच्या कुटूंबातील लोक काम करतात. येथे दररोज आडीचशे लोक येथे दररोज काम करतात. तेथेही एकमेकांना मदत केली जाते. आता मासिक वेतनावर कंपनीमार्फत मजुर भरती करण्याचे करण्याचे नियोजन सुरु आहे.  त्यांना संगमनेर विभागाचे उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, अकोले येतील तालुका कृषी अधिकारी प्रविण गोसावी आणि आत्माचे समन्वयक बाळनाथ सोनवणे यांची सातत्याने मदत होत आहे.


म्हाळुंगी येथे  शेतकरी गट करुन भाजीपाला उत्पादन सुरु केल्यामुळे आता त्यांचे जगणे अधिक सोपे झाले आहे. या भागात खरिप, रब्बी हंगामातच पीके घेतली जात. आता बारामाही पिके घेणे शक्य झाले आहे. गटामुळे खते, बियाणे, औषधे व अन्य शेतीविषय़क बाबीवर वर्षभरात सुमारे वीसलाखापेक्षा अधिक रक्कम खर्च होते. मात्र एकत्रीत खरेदी केल्यामुळे दर कमी लागत असल्याने दोन ते तीन लाखाचा सामुहीक खरेदीतून फायदा होतो.  पारंपारिक पिकांएवजी भाजीपाला उत्पादन आणि विक्री व्यवस्थेचे नियोजन केले जात असल्याने उत्पादनात वाढ झाली आहे. पुर्वी गटातील शेतकऱ्यांना वर्षभरात साधारण एक ते दिड लाख रुपये मिळत. आता हे उत्पन्न चार लाखाच्या पुढे गेले आहे. 

गटातील सदस्यांनी केवळ शेडनेटमध्ये नव्हे तर दोन वर्षापासून खुल्या क्षेत्रावरही रब्बीतील पिके निघाल्यानंतर ब्रुकोली, चायनिज कोथिंबीर, चायनीज मेथी, चायनिज मिरची, कोबी, आईसबर, चायनीज लसुल आदीचे उत्पादन घेत आहेत. त्याची विक्री मुंबई करतात.  ५ टन क्षमतेचे पॅक हाऊस (बांधणी गृह ) उभे करण्याचे प्रस्तावित केले आहे. गटाने मासिक पाचशे रुपये तसेच अन्य बचतीतून पाच लाखापेक्षा अधिक रक्कम जमा केलेली आहे. त्या रकमेतून गटातील सदस्यांना आधार मिळत आहेत. गरजेनंतर पुन्हा गटाकडे पैसे जमा करतात.  गटातील सर्व सदस्य एकावेळी एकच प्रकारचा भाजीपाला घेत असल्याने एखाद्या रोगाचा प्रादुर्भाव कोठे आढळला तर लगेच अन्य सदस्य सावध होऊन उपाययोजना करतात. त्यामुळे नुकसान टाळता येत आहे. याशिवाय दरवर्षी भाजीपाला लागवडीआधी कृषी विभागाकडून मार्गदर्शन मिळण्यासाठी शेतीशाळा, मार्गदर्शन शिबार घेतात.  या भागात डोंगराळ क्षेत्रही अधिक आहे. त्यामुळे गटाने आता 30 हेक्टर क्षेत्रावर आंबा लागवडीचे नियोजन सुरु केले आहे. 
-------------------
संपर्क ः युवराज डामसे मो. 7620127069
---------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu