Ad Code

युवा सरपंच अनिल शेडाळे सरपंच महासंघाचे दक्षिण जिल्हाध्यक्ष

 



अहमदनगर, ः समाजीक कार्यकर्ते व अहमदनगर तालुक्यातील मदडगावचे युवा सरपंच अनिल शेडाळे यांची सरपंच सेवा महासंघाच्या अहमदनगर दक्षिण जिल्हाप्रमुखपदी निवड करण्यात आली आहे. अनिल शेडाळे गेल्या अनेक वर्षापासुन सामाजीक कामात अग्रेसर आहेत. त्यांच्या कामाची दखल घेऊन महासंघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम घोगरे यांनी ही नियुक्ती केल्याचे राज्य प्रसिद्धिप्रमुख भाऊसाहेब कळसकर यांनी सांगितले.  

हेही वाचा ः आमदार बापाला लेक सासरी पाठवताना आश्रु आवरेनात

अनिल शेडाळे हे गेल्या अनेक वर्षापासुन मदडगावचे सरपंच आहे. समाजीक कार्यातून त्यांनी आपली ओळख निर्माण केली आहे. कोरोनामुक्तीत त्यांनी भरीव काम केले आणि गाव कोरोनामुक्त केले. गावांतील तसेच तालुक्यातील लोकांच्या विविध अडचणी सोडवण्यासाठी त्यांचा कायम पुढाकार असतो. मदडगावांत अनेक विकासात्माक कामे करुन शेडाळे यांनी मदडगावांला आदर्श करण्याचा प्रयत्न सुरु ठेवला आहे. त्यांच्या याकामाची पावती म्हणून त्यांची पुरुषोत्तम घोगरे यांनी सरपंच सेवा महासंघाच्या अहमदनगर दक्षिण जिल्हाप्रमुखपदी निवड करण्यात आली आहे. 

-----


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu