आमदार सुरेश अण्णा धस
-----------
by चंद्रकांत नेटके (शिरुर कासार)
--------------------
बीड ः राज्य सरकारला सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण टिकवता आले नाही. आता राज्य सरकारने विनंती याचिका दाखल करण्यात आली आहे. मात्र त्यात आता सरकारने हलगर्जीपणा करू नये अशी अपेक्षा व्यक्त करत भाजप आमदार सुरेश आण्णा धस यांनी राज्य सरकारवर टीका केली. मराठा समाजाचा आवाज त्याला भाजपने पाठिंबा दिलेला आहे तो आवाज सरकारच्या कानावर पर्यंत जावा यासाठी सोमवार दिनांक 28 जून रोजी बीडमध्ये मराठा आरक्षण मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती आमदार सुरेश अण्णा धस यांनी बीड येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. मराठा समाज बांधवांनी या मोर्चामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे.
बीड येथे पत्रकार परिषदेत आमदार सुरेश धस म्हणाले राज्य सरकारला मराठा आरक्षण टिकवता आले नाही. फडणवीस सरकारने
कोर्टात आरक्षण टेकवले मात्र ,या सरकारला ते जमलं नाही. आरक्षण हा मराठा समाजाच्या भवितव्याचा प्रश्न आहे. मराठा आरक्षणाचा
आवाज राज्य सरकार पर्यंत पोहोचण्यासाठी सोमवार दिनांक 28 जून रोजी बीडमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या
पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर आरक्षण मोर्चा काढण्यात येणार आहे.
मराठा आरक्षणा सोबतच शेतकऱ्यांना तातडीने पीक कर्ज वाटप करावे, पीक विम्याचा बीड पॅटर्न उलट्या दिशेने चाललाय, यामध्ये चौकशी करून दोषींवर कारवाई करावी ऊसतोड मजूर म कदम यांच्यासाठी
कायदा करून 85 टक्के भाववाढ द्यावी, काळात काम केलेल्या कंत्राटी कर्मचारी पैकी पात्र कर्मचाऱ्यांना आरोग्य आणि वैद्यकीय सेवा भरतीत थेट नियुक्ती
द्यावी आदी मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात येत असल्याचे आमदार सुरेश आण्णा धस यांनी सांगितले. मराठा समाजातील तरुणांनी
या मोर्चात सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले आहे
0 टिप्पण्या