Ad Code

#ethanol petrol ऊस उत्पादकांचा फायदाच ः पेट्रोलमध्ये इथेनाॅल मिश्रण वाढणार

 

पुणे : भारत सरकारने ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी नुकताच एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. 1 एप्रिल 2023 पासून पेट्रोलमध्ये वीस टक्के इथेनॉल मिश्रित करण्याला परवानगी दिली आहे. भाजप नेते व महाराष्ट्राचे माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना ही माहिती दिली आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाचा शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होऊन ऊसाचा अधिक भाव मिळायला मदत होईल असे सांगितले जात आहे. 

----

हे ही वाचा ः # पीकस्पर्धा. खरिपात चांगले दर्जेदार उत्पादन घ्या, अन सरकारचे भरघोष बक्षीसही मिळवा

-----

भाजप नेते व राज्याचे माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील म्हणाले की केंद्र सरकारनं त्या निर्णयाबद्दल राजपत्र प्रसिद्ध केलं आहे. केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाने एका अधिसूचना प्रसिद्ध केलीय. केंद्र सरकारच्या या निर्णयाद्वारे सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये भारतीय मानक ब्युरोच्या नियमांनुसार तेल कंपन्या 20 टक्के इथॅनॉलची पेट्रोलमध्ये वीस टक्के मिश्रित करता येईल. सध्या दहा टक्के इथेनाॅल मिश्रीत करता येत होते. अजून दोन वर्षांनी म्हणजे 1 एप्रिल 2023 पासून ही प्रक्रिया अमलात येईल. 


 केंद्राचा निर्णय देशातील साखर कारखाने व ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी खूप मोठा दिलासा ठरणार आहे. या निर्णयामुळे साखर उद्योगाला व देशाच्या अर्थव्यवस्थेला ऊस उत्पादनातून होणाऱ्या प्रक्रिया उद्योगाला अधिक चालना मिळणार आहे. 

हे ही वाचा ः # milk #दुध भावाचा प्रश्न ः आता मोठ्या लाढाईशिवाय पर्यायच नाही ः डाॅ. अजित नवले यांनी केले शेतकऱ्यांना अवाहन

राज्यात बरेच साखर कारखाने इथेनाॅलची निर्मिती करतात. मात्र तरीही साखरेला पुरेसा दर मिळत नाही. आता केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे इथेनाॅल उत्पादन वाढीला वेग येईल आणि त्याचा फायदा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळेल. उस उत्पादकांना अधिक दर मिळण्याला मदत होणार आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu