जागतीक दृष्टीदान दिन 10 जून
अहमदनगर ः एखाद्या व्यक्तीने जिद्द केली तर त्याचे फलितही खुप वेगळे मिळते. अहमदनगर येथील असाच एक अवलिया आहे. त्याने 27 वर्षापुर्वी जिद्दीने गोरगरिब सामान्य लोकांसाठी डोळ्याच्या उपचारासाठी नेत्रशस्त्रक्रिया शिबीर सुरु केले. आतापर्यत तेराशेपेक्षा शिबीरे सलग घेतली. सात लाख लोकांची तपासणी केली तर 1 लाख 93 हजार लोकांच्या मोफत डोळ्याच्या शस्त्रक्रिया झाल्या. मरनोत्तर नेत्रदान करण्याचे अवाहन केले, त्यातून 635 लोकांचे नेत्रदान झाले आणि 1270 लोकांच्या जीवनातील अंधार दुर झाला. ही किमया साधलीय अहमदनगर येथील समाजीक कार्यकर्ते जालिंदर बोरुडे यांनी.
अहमदनगर येथील पाटबंधारे विभागात शिपाई म्हणून काम करत असलेले बोरुडे नागरदेवळे येथील राहिवीसी आहेत. ते असं सांगतात की, सत्तावीस
वर्षांपूर्वी त्यांना आईच्या डोळ्याची शस्त्रक्रिया करायची होती. मात्र
खासगी रुग्णालयातून शस्त्रक्रियेसाठी सांगितलेली रक्कम परवडणारी नव्हती.
अडचणीला सामोरे जावे लागले. आपल्यासारखे अनेक शेतकरी, कष्टकरी, कामगार गरीब
कुटुंबे आहेत. त्यांनाही अशाच अडचणींना सामोरे जावे लागत असेल. त्यामुळे त्यांनीच गरिब लोकांसाठी डोळ्याच्या उपचारासाठी शिबीरे घेण्याचा निर्णय़ घेतली. त्यांच्या फिनिक्स फाऊडेशनच्या माध्यमातून तेव्हापासून सलग मोफत
नेत्रतपासणी शिबिरे सुरू आहेत.
हे ही वाचा ः
गांडूळ खतातून मिळतेय चांगले उत्पन्न ः प्रशांत पुलाटे या तरुणांची गौरवगाथाआता बोरुडे दर महिन्याला पाच शिबिरे घेतात. ज्या व्यक्तीच्या डोळ्याची
शस्त्रक्रिया करण्याची गरज आहे त्यांच्यावर पुण्यात मोफत शस्त्रक्रिया केली
जाते. संबंधित रुग्णाच्या प्रवासासह जेवण, राहण्याचा खर्च हॉस्पिटल करतात.
आतापर्यंत ७ लाख लोकांची तपासणी केली, तर दोन लाख जणांची
नेत्रशस्त्रक्रिया केली आहे. तर आतापर्यंत ७८ हजार लोकांनी नेत्रदान
करण्याचा संकल्प केला आहे कोरोना काळातही
राज्यात एकमेव ही शिबिरे सुरू होती. त्याची राष्ट्रीय अंधत्व निवारण समिती
दिल्ली यांनी दखल घेऊन आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्या हस्ते नुकताच
जालिंदर बोरुडे यांचा गौरव केला आहे.
नेत्रदान चळवळ गरजेची आहे. नोकरी करताना ग्रामीण भागासह शहरातील विडी
कामगार, बांधकाम कामगार, हमाल, कष्टकरी, शेतकरी, मजूर, महिला, गरीब, वंचित
घटकांसाठी काही तरी केले पाहिजे, असे नेहमी मनात येत असे. हा विचार स्वस्थ
बसू देत नव्हता. गोरगरिब लोकांना उपचार सहज मिळावेत यासाठी माझी धडपड आहे. मी काम अविरत सुरु ठेवणार असल्याचे जालिंदर बोरुडे यांनी सांगितले. शिबारात कोणाला सहभागी व्हायचे असेल, तपासणी करायची असेल किंवा शस्त्रक्रिया करायची असेल तर महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातील व्यक्ती 9881810333 या संपर्कावर कधीही संपर्क करुन सहभागी होऊ शकता असे बोरुडे यांनी सांगितले आहे.
0 टिप्पण्या