Ad Code

#kapus कापुस लागवडीबाबत कृषी विद्यापीठाने दिलाय सल्ला




राहुरी (जि. नगर) ः  पुढील पाच दिवस पावसाचा अंदाज आहे. शेतकऱ्यांनी कापुस लागवड, पेरणीची तयारी केलीय.  चांगला व पुरेसा पाऊस झाला तर 15 जूनपर्यत बीटी कापसाची लागवड करायला हरकत नाही असा सल्ला  राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठातील हवामान विभागाने दिलाय. 

खरिप हंगाम सुरुच होतोय. खरिपात बहूतांश शेतकरी प्रामुख्याने सोयाबीन, बाजरी, तुर, उडीद, मुग, भुईमुग, मका ची पेरणी करतात. सध्या शेतकऱी खरिपाची तयारी करत आहेत. अजून मान्सुनचा पाऊस यायचाय, पण पुढील पाच दिवस वादळी वाऱ्यासह पुर्वमोसमी पावसाची शक्यता आहे. 

हे ही वाचा ः kovid-19 आला ना जी आर ः चांगल्या कामाचा मिळणार पुरस्कार , गुणांकऩ मिळवणे महत्वाचे

चांगला पाऊस पडला तर बीटी कापसाची लागवड करायला हरकत नाही. कापुस लागवड 90 बाय 90 सेंटीमीटर किंवा 120 बाय 60 सेंटींमीटर अंतरावर लागवड करावी. हेक्टरी 10 टन शेणखत घालावे. रसशोषणाऱ्या किडीच्या नियंत्रणासाठी रस शोषणार्‍या किडींच्या नियंत्रणासाठी कपाशीभोवती एक मीटर अंतरावर मका व चवळीची एका आड एक लागवड करावी. तसेच कपाशीच्या प्रत्येक ९ व्या ओळीच्या दुसर्‍या बाजूस मका, चवळी व राळा या पिकांची लागवड करावी.


पावसात घ्या काळजी 

पावसाची शक्यता असल्याने, कापणी केलेली पिके शेडमध्ये किंवा प्लास्टिकच्या कागदाने झाकून ठेवावीत.  वादळी वाऱ्याची शक्यता असल्याने, फळ पिकाचे संरक्षण करण्यासाठी बांबू किंवा लाकडी काठ्याचा आधार देऊन प्लॅस्टिक दोरीच्या सहाय्याने झाडे एकमेकांना बांधून घ्यावीत जनावराना उघड्यावर चरावयास पाठवु नये, तसेच त्याच्याकडे बारकाईने लक्ष द्यावे तसेच झाडाखाली बांधु नयेत. जनावरे गोठ्यात बांधावीत आणि चारा उपलब्ध करुन द्यावा. शेडमध्ये पाणी साचू नये याची काळजी घ्यावी. जर पाणी साठलेल्या कोरड्या चार्यावर पडले आणि बुरशीचे आक्रमण आढळले तर तो चारा जनावरांना देवु नयेहवामान अंदाजावर आधारित कृषी सल्ला व हवामानचा पूर्वानुमानाकरीता मेघदुत मोबाईल अॅपचा वापर करावावीजेच्या अंदाजाचा पूर्वानुमानाकरीता दामिनी मोबाईल अॅपचा वापर करावा असे विद्यापीठाने सांगितलेय. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu