Ad Code

# korona दहा जिल्ह्यात सोमवारपासून बऱ्यापैकी लाॅकडाऊन खुले



 मुंबई ः कोरोना रुग्णांची संख्या कमी झालेल्या तसेच आॅक्सीजन खाटांचा वापर यावर आधारीत सरकारने राज्यातील जिल्ह्यांचे चार गट पाडले आहे. त्यात पहिल्या गटातील दहा जिल्ह्यात सोमवारपासून बऱ्यापैकी खुले होणार आहे. दुसऱ्या गटात सर्व दुकाने व खाजगी सुरु राहणार आहेत तर माॅल 50 टक्के सुरु राहतील. तिसऱ्या गटात माॅल बंद राहतील. दुकाने व खाजगी कार्यालये दुपारी चार वाजेपर्यत सुरु राहतील तर चौथ्या गटात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद राहिल.  तेथे संचारबंदी कायम असेल. माॅल बंदच राहतील असे मार्गदर्शक तत्वे सरकारने दिली आहेत. त्यानुसार त्या त्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आदेश काढतील,. 

 हे ही वाचा ः शेतकऱ्याांना सल्ला ः भुईमुग, मुग, उडीद, मका, बाजरीसाठी आहेत हे वान फायद्याचे

कोरोना संसर्गाची बाधा होऊन रुग्णसंख्या वाढत असल्याने लाॅकडाऊन करण्यात आले होते. आता महाराष्ट्रातील बहूतांश जिल्ह्यात रुग्णसंख्या कमी होत आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने अनलाॅकच्या दृष्टीने काही मार्गदर्शक तत्वे केली आहेत. 


त्यानुसार पहिल्या गटात पाॅझिटीव्हीटी दर पाच टक्क्यापेक्षा कमी व उपलब्ध आॅक्सीजनचा बेडचा वापर 25 टक्क्यापेक्षा कमी होतोय, दुसऱ्या गटात पाॅझिटीव्हीटी दर पाच टक्क्यापेक्षा कमी व आॅक्सीजनचा बेडचा वापर 25 ते 40 टक्के होतोय, तिसऱ्या गटात पाॅझिटीव्हीटी दर पाच ते दहा टक्के टक्के व उपलब्ध आॅक्सीजनचा बेड 40 टक्क्यापेक्षा अधिक भरलेले असतील, व चौथ्या गटात पाॅझिटीव्हीटी दर 10 ते 20 टक्के असेल व उपलब्ध आॅक्सीजनचा बेड 60 टक्क्यापेक्षा अधिक भरलेले असतील.  

हे ही वाचा ः # धडपड ः नोकरी गेली, उपासमारीची वेळ आलीय, काय करणार...इच्छा असूनही संकटकाळात मदत करता आलाी नाही

शासनाने केलेल्या गटानुसार पहिल्या गटातील धुळे, जळगाव, जालना, नगर, लातुर, नांदेड, यवतमाळ, चंद्रपुर, नागपुर, गोंदीया या जिल्ह्यात कोरोना नियमाचे पालन करत बऱ्यापैकी लाॅकडाऊन खुले होईल व व्यवहार सुरु होतील. दुसऱ्या गटात नंदुरबार व हिंगोली जिल्हे आहे. 


तिसऱ्या गटात गडचिरोली, भंडारा, वर्धा, अमरावती, अकोला, वाशीम, परभणी, बीड, उस्मानाबाद, पालघर, ठाणे, नाशिक, औंरंगाबाद, मुंबई, तर चौथ्या गटात सिंधुदुर्ग, कोल्हापुर, सांगली, रत्नागिरी, रायगड, बुलढाणा, सातारा हे जिल्हे आहेत. लाॅकडाऊनमध्ये शिथीलता आली असली तरी लग्नसमारंभ, अत्यविधी व अन्य कार्यक्रमात कोरोनाबाबतचे निर्बंध पाळावे लागणार आहेत. 

----------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu