Ad Code

# korona कोरोनात लोकांना आधार दिला. गावकऱ्यांनी मिरवणूक काढून केला सत्कारशेवगाव ः कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेकांना मोठा त्रास सोसावा लागला. उपचार बाधा झालेल्यांना उपचारासाठी लाखो रुपये मोजावे लागले. मात्र नगर जिल्ह्यातील अमरावपुर (ता. शेवगाव) येथे मात्र डाॅ. अरविंद पोटफोडे यांनी केवळ तीस रुपयांत कोरोना रुग्णांवर उपचार करुन हजारो शेतकरी, कामगार, गरिब रुग्णांना बरे केले. त्याची उतराई म्हणून गावकऱ्यांनी डाॅक्टरांची सवाद्य मिरवणूक काढत कृतज्ञता व्यक्त करुन गावकऱ्यांनी गौरव केला. यावेळी भारावलेल्या डाॅक्टरांनाही मोठे काम केल्याची भावना व्यक्त केली. 

मार्च ते जून पर्यत कोरोनाची दुसऱी लाट होती. यंदा गेल्यावर्षीपेक्षा अधिक रुग्णसंख्या होती. विशेषतः ग्रामीण भागातील शेतकरी, कष्टकरी, कामगार, मजुर व सामान्य नागरिकाची यंदा बाधित रुग्णांत संख्या मोठी होती. कोरोनात अनेकांना नातेवाईक, अप्तेष्ट गमवावे लागले. मात्र उपचार घेताना लाखो रुपये खर्च करावे लागले. त्यातून डाॅक्टर आणि लोकांत मतभेद झाल्याचेही आणि डाॅक्टराबद्दल नकारात्मक भावना तयार झाल्याचे महाराष्ट्राने अनुभवले आहे. अशा काळातही संवेदनशीलता जपणाऱ्या काही डाॅक्टरांमुळे मात्र लोकांना मोठा दिलासा मिळाला. 

हे ही वाचा ः # korona डेल्टा प्लस व्हेरियंट अती धोकादायक, जागतीक आरोग्य संघटनेचा इशारा

त्यातील एक अनुभव नगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील अमरापुरात आला. डाॅ. अरविंद पोटफोडे यांचे येथे छोटेशे रुग्णालय आहे. त्यांनी कोरोना काळात तीन महिने लोकांची सेवा करण्याचा निर्णय घेतला. कोरोना रुग्णांसाठी त्यांच्या  हाॅस्पीटलमध्ये जागा नसल्याने रस्त्यावर झाडाखाली केवळ तीस रुपयांत तपासणी करुन तीन महिने त्यांनी लोकांवर उपचार केले. आर्थिक अडचण असलेल्या  शेकडो रुग्णांना डाॅ. पोटफोडे यांच्याकडून आधार मिळाला. काही काळ शेवगाव तालुक्यातील अॅड. शिवाजीराव काकडे व जिल्हा परषद सदस्य हर्षदा काकडे यांनी सुरु केलेल्य कोविड सेंटरमध्ये डाॅ पोटफोडे यांनी  मोफत उपचार केले. 

त्यामुळे नगरसह राज्यातील अनेकांनी येथे येऊन उपचार घेतले आणि पाच हजाराच्या जवळपास रुग्ण बरे झाले. विशेष म्हणजे त्यांनी कोणत्याही रुग्णांसाठी रेमडेसीवीर अथवा, फॅमीफ्लु गोळ्यांचा वापर केला नाही. त्याएवजी नियमितची औषधे वापरली. डाॅ. पोटफोडे यांच्यामुळे हे शक्य झाल्याने गावकऱ्यांनी कृतज्ञता म्हणून डाॅ. पोटफोडे यांच्यासह त्यांच्यासोबत कोविड सेंटरमध्ये सेवा देणाऱ्या डाॅक्टरांची सवाद्य मिरवणूक काढून गौरव केला. 

 उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंडे, नायब तहसीलदार रमेश काथवटे , जिल्हा परिषद सदस्या हर्षदा काकडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.कैलास कानडे, सुरेश पाटेकर, गडचिरोली येथील उपविभागीय अधिकारी गणेश मोटकर, डॉ.श्वेता फलके, डॉ. विजय फलके, डॉ. मुकुंद गमे, डॉ. सोमनाथ काटे, डॉ. प्रमोद नेमाने, डॉ.गणेश पाडळे, डॉ. रोहित पाटील, जगन्नाथ गावडे, सरपंच संगिता पोटफोडे यांच्यासह गावकऱी सहभागी झाले होते. कोरोना काळात रुग्णसेवा केलेल्या डाॅक्टरांची मिरवणूक काढून गौरव केल्याचे पहिल्यांच पहायला मिळाले. गौरवाने डाॅक्टरही भारावले. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu