मुंबई ः कोरोना काळात गाव कोरोनामुक्त करण्यासाठी सार्वजनिक प्रयत्न करुन गाव कोरोनामुक्त करुन चांगले काम करणाऱ्कया गावाला पारितोषीक मिळणार आहे. हे पुरस्कार मिळण्यासाठी मात्र त्या-त्या गावाला गुणांकनात पात्र व्हावे लागणार आहे.पन्नास गुणांची परिक्षाच गावकऱ्यांना द्यावी लागेल,
कोरोना व्हायसचा संसर्ग् धुमाकुळ घालतोय. हा संसर्ग रोखण्यासाठी गावकऱ्यांची भूमिका महत्वाची आहे. अनेक गावांत तसे प्रयत्न झाले आणि त्यातून गावे कोरोनामुक्त झाल्याचे पहायला मिळावे. अगदी नगर जिल्ह्यातील हिवरेबाजारसह अनेक गावांनी हे दखवून दिले. त्यामुळे या उपक्रमाला अधिक प्रोत्साहन मिळावे यासाठी सरकारने कोरोनामुक्त गाव पुरस्कार योजना सुरु केलीय.
हे हा वाचा ःग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ थेट नगरच्या कार्यक्रमाला येणार
पात्र गावांला पहिले 50 लाख, दुसरे 25 लाख आणि तिसरे 15 लाखाचे पारितोषीक मिळणार आहे. त्यासाठी मात्र ग्रामविकास विभागाने ठरवून दिलेेले गुणांकन पात्र करावे लागणार आहे. अगदी तंटामुक्त अभियान, संपुर्ण स्वच्छता अभियान योजनेच्या धर्तीवरच ही योजना असल्याचे दिसतेय. गावांतील सामान्य लोकांचा यात सहभाग अपेक्षित आहे.
ग्रामसमित्या स्थापना व सहभाग, समित्या अंतर्गत पथकांची नियुक्ती, डाॅक्टर, कर्मचारी, स्वयंसेवकांचा सहभाग, कोरोनाबाधित कुटूंबाचे सर्वेक्षण, अॅन्टीजन टेस्ट व पुढील उपचारासाठी रुग्णांना कोविड सेंटरला पाठवणे, कोविड संशयित रुग्णांना विलीगीकरण कक्षात ठेवणे, तेथे दिल्या जाणाऱ्या सुविधा, गावांतील समाजीक संस्थाचा सहभाग, बाधित कुटुंबाशी नियमित संवाद, लसीकरण, जनजागृतीच्या उपाययोजना, मृत्यूदर, पथकातील एकही स्वयंसेवक कोरोनाबाधित न होण्यासाठी नियमांचे पालन करणे, आईवडील दुर्दैवाने मृत्य पावलेल्या अनाथ मुला-मुलींचा संभाळ आदी बाबीवर गुण दिलेे जाणार आहेत.
0 टिप्पण्या