Ad Code

# mansun वाटचाल चांगली ः आपल्याकडे तीन- चार दिवसात येण्याचा अंदाज


 

पुणे ः काल गुरवारी दि. 3 रोजी केरळात आलेला मान्सुन वेगाने पुढे सरकतोय. आज दि. 4 रोजी कर्नाटक, आध्रप्रदेशापर्यत आला असुन गोवा, महाराष्ट्रात तीन ते चार दिवसात येईल असा अंदाज हवामान विभागाने सांगितला आहे. मोसमी पाऊस येणार असल्याचा हवामान विभागाचा सांगावा असल्याने शेतकरी बि- बियाणांसाठी लगबग करत आहेत. 

------

हे ही वाचा ः # milk #दुध भावाचा प्रश्न ः आता मोठ्या लाढाईशिवाय पर्यायच नाही ः डाॅ. अजित नवले यांनी केले शेतकऱ्यांना अवाहन

------

दरवर्षी साधारण येणारा मान्सुनचा पाऊस यंदाही गेल्यावर्षीप्रमाणेच 3 जूनला केरळात आला. केरळात  आला म्हणजे त्याचे लवकरच आपल्या भागात आगमन होईल असे  संकेत मानले जातात. अंदमान बेटांवर एक दिवस उशिराने आलेला मान्सुन बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या  यास चक्रीवादळामुळे वेगाने पुढे सरकु लागला खरा मात्र नंतर मोसमी वाऱ्याची स्थिती पुरेसी नसल्याने केरळात यायला मात्र उशिर झाला. 

------

माती परीक्षण करूनच खरीप हंगामात पिकांची लागवड करा

-----

काल दि. 3 जून रोजी केरळात आल्यानंतर आता पुढे सरकण्याला  पोषक वातावरण आहे. त्यामुळे दुसऱ्या दिवशी दि. 4 जून रोजी केरळसह कर्नाटक, तामिळनाडू व आंध्रप्रदेशाचा काही भागात मोसमी पाऊस पोचला आहे. पुढे सरकायलाही पोषक वातावरण आहे. त्यामुळे आपल्याकडे महाराष्ट्रात तीन ते चार दिवसात पोचेल असा हवामान खात्याचा अंदाज आहे. 

गेल्या चार दिवसापासुन महाराष्ट्रातील अनेक भागात पुर्वमोसमी पाऊस पडत आहे, काही ठिकाणी तर जोरदार पावसाने ओढ्याला पाणी पाहिले. नांगरटी करुन ठेवलेल्या शेतात आता पेरणीची ओढ लागली आहे. मात्र पुरेसा पाऊस झाला तरच पेरणी करा असा सल्ला कृषी विद्यापीठांनी दिला आहे. टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu