Ad Code

# milk #दुध भावाचा प्रश्न ः आता मोठ्या लाढाईशिवाय पर्यायच नाही ः डाॅ. अजित नवले यांनी केले शेतकऱ्यांना अवाहन


अकोले (जि. नगर,) ः लुटता कशाला फुकटच न्या असे सांगत आम्ही गेल्यावर्षी अंदोलन केले. मात्र सरकारच्या  भूमिकेत काहीत फरक पडत नाही. लाॅकडाऊनची संधी शोधत खाजगी दुध संघाकडून शेतकऱ्यांची लुट सुरु  आहे. दुध धंदा करावा का नाही असा प्रश्न निर्माण झालाय. किती दिवस हे सहन करायचे. दुधाच्या  धंद्यात सरकारचे लोक सामील झालेत. त्यामुळे त्यांनाही लक्ष द्यायला वेळ नाही. आता मोठ्या लढाईशिवाय पर्याय नाही. तरुणांनो तुम्ही जागे व्हा, आपल्याला आठ दिवसात दुधाचे भाव वाढीसाठी  मोठे अंदोलन करायचे आहे.असे अवाहनच शेतकरी नेते आणि किसान सभेचचे सरचीटणीस काॅम्रेड डाॅ. अजित नवले यांनी केले आहे.  

-----

हे ही वाचा ः #kapus कापुस लागवडीबाबत कृषी विद्यापीठाने दिलाय सल्ला

------

कोरोनामुळे लाॅकडाऊन झाल्याने दुधाची मागणी कमी झाल्याचे स्षष्ट करत शेतकऱ्यांकडून खरेदी केल्या  जात असलेल्या दुधाचे दर प्रती लिटर 10 ते 11 रुपयांनी कमी केल्याच्या पाश्वभूमीवर पुन्हा एकदा शेतकऱ्यांचेे अंदोलन सुरु  होणार आहे. त्याबाबत  डाॅ. अजित नवले यांनी दुध व्यवसायातील शेतकरी, तरुणांना अवाहन केले. 

 दुध उत्पादकांवर सातत्याने अन्याय होत आहे. दुधाची मागणी काही प्रमाणात कमी झाली आहे. मात्र लोकांनी दुध खाण्याचे कुठेही कमी केल्याचे दिसत नाही. उलट घरीच लोक असल्याने शहरी ग्राहकांचा दुधाकडे कल वाढल्याचे पहायला मिळत आहे. त्यामुळे फार मागणी कमी झाली असे नाही. मात्र खाजगी दुध संघ चालकांचा एकोपा आहे. ते ठरवून दुधाचे भाव पाडतात. संधीचा फायदा घेऊन शेतकऱी, दुध उत्पादकांना पिळण्याचे काम केले जात आहे. यांना विचारणारे कोणी नाही. 

-----

हे ही वाचा ः # गौरवगाथा ः तरुणाने हार नाही मानली, जिद्दीने सुरु केला व्यवसाय. ही गौरवगाथा तर वाचलीच पाहिजे.

------

शेतकरी  संपाच्या  वेळी आम्ही दुध प्रश्नावर अंदोलन के ले. गेल्यावर्षीही दुध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती व किसान सभेने महाराष्ट्ात एल्गार पुकारला. त्यामुळे काही प्रमाणात का होईना दुधाचे भाव वाढले होते आता पुन्हा संघ चालकांनी मागणी नसल्याचे सांगत भाव कमी केले आहे. एकतर खाद्याचे भाव वाढले आणि दुधाचे भाव कमी केले. तरुण शेतकऱ्यांनी हा व्यवसाय करायचा का नाही. फक्त लुटले जात आहे. त्यामुळेच आम्ही गेल्यावर्षी म्हणालो होतो  लुटता कशाला फुकटच न्या. सरकारमधील लोकांचे दुध संघ असल्याने  शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही. त्यामुळे आता दुध उत्पादक संघर्ष समिती व किसान सभेतर्फे आठ दिवसात दुध उत्पादकांच्या मागण्यासाठी अंदोलन सुरु केले जाणार आहे. 

पिशव्यातून व त्यात पाणी घालून ग्राहकांना विकल्या जाणाऱ्या दुधाचे व त्यापासून  तयार केलेल्या उपपदार्थांचे दर मात्र कमी केलेले नाहीत. त्यामुळे दरासाठी केवळ दुध उत्पादकांचाच नाही तर दुध खरेदी करणाऱ्या ग्राहकांचीही लढाई आहे. दुध उत्पादकांच्या लढ्यात ग्राहकांनीही सहभागी होण्याची गरज निर्माण झाली आहे. 

------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu