पुणे ः महाराष्ट्रात दुधाला दर मिळत नाही. खाजगी दुध संघावाले वाट्टेल तो दर देत आहेत. जनावरांच्या खाद्याचे दर मात्र वाढले आहेत. महाराष्ट्रात दुध धंद्याचे वाटोळे होत असताना सरकार लक्ष देत नाही. त्यामुळे गुरुवारी दि. 17 जुन 2021 रोजी महाराष्र्ट्र राज्यात दुधाला भाव मिळावा यासाठी तीव्र अंदोलन करण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या राज्य कौन्शीलच्या बैठकीत ठरले आहे.
सबंधित बातमी ः # milk दूधाचा भाव देता येत नाही म्हणता, करा की मग खाजगी दुध संघाचे आॅ़डीट
महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या राज्य कौन्शीलच्या सर्व पदाधिकारी व प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत महाराष्ट्रातील दुध प्रश्नावर अंदोलन करण्याचे ठरले आहे. कोरोना संकटामुळे लाॅकडाऊन झाल्याचा फायदा घेत सर्वच खाजीगी दुध संघांनी दुधाचे भाव कमी केले. दुधाला व त्यापासून तयार होणाऱ्या सर्वच पदार्थांना मागणी नसल्याचे खाजगी दुध संघाच्या मालकांचे म्हणणे आहे.
खरं तर गेल्या वर्षभरापासून दुधाला भाव दिला जात नाही. सहा महिन्यापासून जनावरांना लागणाऱ्या खाद्याचे दर वाढले आहेत. तर दुधाचे भाव कमी झाले आहेत. त्यामुळे दुधाचा धंदा कसा जगवावा असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. मागील दोन महिन्यापासून दुधाच्या प्रत्येक लिटरला 10 ते 13 रुपये कमी देत आहेत. हा शेतकऱ्यांवर ठरवून चालवलेला अन्याय आहे. शेतकरी, कष्टकऱ्यांची सर्रासपणे लुटमार सुरु असताना सरकार मात्र डोळे झाकून बसले आहे. दररोज 13 ते 14 कोटी रुपयाचा तोटा दुध धंदा करणाऱ्या शेतकऱ्यांना बसला आहे.
वाचा ः # petrol कहर झालाय, पेट्रोलला प्रतीलिटर झाले 104 रुपये
त्यामुळे आता महाराष्ट्र राज्य किसान सभेने यात उडी घेतली आहे. याआधीही दुधाच्या प्रश्नावर किसान सभेने राण पेटवलेले होत. त्यावेळी नाईलाजाने सरकारला दुध खरेदी करावे लागले, तसेच खाजगी दुध संघ मालकांना दर वाढवून द्यावे लागले. आता दोन महिन्यापासुन दुधातून होत असलेली लुटमार पहावत नाही. त्यामुळे 17 जून रोजी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यामध्ये दुधाला भाव मिळावा म्हणून अंदोलन करत आहोत. त्यामुळे दुध उत्पादक शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे तसेच शेतकऱ्यांसाठी काम करणाऱ्या संघटनांनीही सहभागी व्हावे असे अवाहन डाॅ.अशोक ढवळे, डाॅ. अजित नवले, माजी आमदार जे. पी, गावीत, अर्जुन नाडे, किसन गुजर, उमेश देशमुख, यांच्यासह प्रमुख कार्यकर्त्यांनी केले आहे.
0 टिप्पण्या