Ad Code

# milk दूधाचा भाव देता येत नाही म्हणता, करा की मग खाजगी दुध संघाचे आॅ़डीटपुणे  : कोरोना असल्याचे सांगून महाराष्ट्रात खाजगी संघ चालकांनी दुधाचे भाव पाडलेत. मग अतिरिक्त दुध कुठे आहे ते दाखवा. दुधाचा भाव मोठ्या प्रमाणात कमी करणे म्हणजे उघडपणे सुरु असलेली ही लुटमार आहे. मागणी नाही म्हणून दुधाला भाव देता येत नाही म्हणताय ना, मग करा की आतापर्यत खरेदी केलेल्या दुधाचे आॅडीट. होऊन जाऊ द्या चौकशी. महाऱाष्ट्राला कळेल वस्तुस्तिथी. महाराष्ट्रातील किसान सभेच्या नेत्यांनी ही मागणी केली आहे. 

 -----

सबंधित बातमी ः # milk #दुध भावाचा प्रश्न ः आता मोठ्या लाढाईशिवाय पर्यायच नाही ः डाॅ. अजित नवले यांनी केले शेतकऱ्यांना अवाहन

कोरोनमुळे झालेल्या लॉकडाउनचा गैरफायदा घेत खासगी दूध कंपन्या व सहकारी दूध संघांनी दूध खरेदीचे दर प्रति लिटर 10 ते 12 रुपयांनी पाडले आहेत. मात्र फार अतिरिक्त दूध झाले असे कोणी म्हणत असेल तर तसे मुळीच नाही. महाराष्ट्र राज्य सरकारने या लुटमारीची तातडीने दखल घ्यावी. सर्व खासगी दूध कंपन्या व सहकारी दूध संघाचे लॉकडाउन काळात दूध खरेदी व विक्रीचे ऑडिट करावे. 

कंपन्यांनी प्रत्यक्षात, या काळात किती दूध काय दराने खरेदी केले व किती दराने विकले याची वस्तुनिष्ठ आकडेवारी राज्य सरकारने प्राप्त करून घ्यावी व या आधारे नक्की राज्यात किती दूध अतिरिक्त ठरले होते व त्यासाठी किती भाव कमी करणे अपेक्षित होते, या बाबत सखोल चौकशी करावी, अशी मागणी किसान सभेचे महाराष्ट्रातील प्रमुख नेते डॉ. अशोक ढवळे, जे. पी. गावित, किसन गुजर, डॉ. अजित नवले यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी मागणी केली आहे, ‘

गौरवगाथा ः # गौरवगाथा ः तरुणाने हार नाही मानली, जिद्दीने सुरु केला व्यवसाय. ही गौरवगाथा तर वाचलीच पाहिजे.

प्रति लिटर दुधाचे दर १० ते १८ रुपयाने पाडावे, अशी कोणतीच आणीबाणी दूध क्षेत्रात निर्माण झालेली नाही. असे असताना मागणी घटल्याने दुधाचा महापूर आला, अशी अत्यंत चुकीची आवई उठवून दूध कंपन्यांनी शेतकऱ्यांना लुटले आहे. अवास्तव दर पाडणाऱ्यांवर या माध्यमातून कठोर कारवाई करावी. शेतकऱ्यांची या माध्यमातून कंपन्या व दुध संघांनी केलेली लूट वसूल करून शेतकऱ्यांना परत करावी. लूटमार होऊ नये यासाठी खासगी व सहकारी दूध संस्थांना लागू असेल, असा लूटमार विरोधी कायदा करावा, दुधातील भेसळीवर कठोर निर्बंध आणणाऱ्या उपाययोजना करण्याची अपेक्षा किसान सभेने व्यक्त केली आहे. किसान सभेच्या अक्रमक भूमिकेमुळे दुधाच्या भावाचा प्रश्न पेटणार असल्याचे दिसू लागले आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu