Ad Code

#onion कांद्यांचे असे आहेत आजचे भाव, भावात कमी-जास्तपणा सुरुच


नाशिक/अहमदनगर ः कोरोनामुळे गेल्या काही दिवसापासून राज्यात लाॅकडाऊन होते. त्यामुळे बहूतांश भागात कांद्याची-खरेदी विक्री बंद होती. आता कांद्याचे लिलाव सुरु झाले  आहेत. राज्यात बहूतांश बाजार समित्यात सरासरी कांद्याला 200 रुपयापासून 1800 ते 2000 हजार रुपयेपर्यतचा क्विंटलला भाव मिळाला.  
 
अहमदनगर जिल्ह्यात घोडेगाव, अहमदनगर, पारनेर, राहाता, राहुरी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा विक्रीसाठी येत असतो. सोमवारी अहमदनगर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत चार हजार शंभर टन कांदा विक्रीला आला. येथे एक नंबर दर्जाच्या कांद्याला 1550 ते 2000 रुपये क्विंटल, दोन नंबर दर्जाच्या कांद्याला 1000 ते 1550, तीन नंबर दर्जाच्या कांद्याला 500 ते 1000 व चार नंबर दर्जाच्या कांद्याला 200 ते 500 रुपये क्विंटलचा भाव मिळाला.  


कोल्हापुरात 700 ते 2400 रुपये व सरासरी 1650 रुपये क्विंटल भाव, पुण्यात 800 ते 2000 रुपये व सरासरी 1350 रुपये क्विंटल भाव, नासिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत येथे 1000 ते 2600 व सरासरी 2051 क्विंटल भाव, लासलगाव (जि. नाशिक) बाजार समितीत 700 ते 2100 व सरासरी 1850 रुपयाचा दर मिळाला आहे. सोलापुरला 500 ते 2000 हजारापर्यत क्विंटल भाव मिळाला. महाराष्ट्रात आज सोमवारी सरासरी कांद्याला 200 ते 2100 रुपयांपर्यत दर होता. काही ठिकाणी दरात कमी-जास्त होत होते. 
-------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu