Ad Code

# petrol कहर झालाय, पेट्रोलला प्रतीलिटर झाले 104 रुपये


हिंगोली ः कोरोना सारख्या गंभीर संकटामुळे शेतकरी, सामान्य नागरिक, कष्टकरी, कामगार त्रस्त आहेत. अनेकांना आपल्या नोकरी, रोजगार वाचवायची चिंता आहे. अशातच आता पेट्रोल, डिझेलचे दर झपाट्याने वाढत आहे. आज मराष्ट्रातील हिंगोली येथे तर चक्क 104 रुपये एका लिटरला मोजावे लागले. संकटात इंधन दरवाढीचा कहर झाला असल्याची भावना लोक व्यक्त करु लागले आहेत. डिझेलही 95 रुपयेे लिटरच्या पुढे गेले आहे. 

वाचा ः # milk दुध दरासाठी गुरुवारी महाराष्ट्रात अंदोलन

राज्यात गेल्या  काही दिवसापासून सतत पेट्रोल व डिझेलचे भाव वाढत आहेत. गेल्य वर्षभरापासून कोरोनाने कहर केला आहे. कोरोना वाढत असल्याने दोन महिने लाॅकडाऊन होते. या काळात अनेक छोटे-मोठे व्यवसाय अडचणीत आले. अनेक सामान्य माणसाची दयनिय आवस्था झाली. अनेकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या. शेतीक्षेत्रावरही इंधन दरवाढीचा परिणाम झाला. त्यामुळे सारेच त्रस्त झाले आहेत. मात्र पेट्रोलचे भाव कमी व्हायला तयार नाहीत

आज सोमवारी दि. 14 रोजी सकाळी महाराष्ट्रातील हिंगोली येथे पेट्रोलचा दर 104 रुपये प्रती लिटर तरडिझेल 95 रुपये लिटर होता. मुंबईत हा दर 102 रुपये प्रती लिटर होता. महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यात 102 रुपये प्रती लिटरच्या जवळपास पेट्रोलचा दर होता. डिझेलही 94 रुपये लिटरच्या पुढे गेले आहे. आता सहजपणे पेट्रोल व डिझेलच्या भावात वाढ होत असताना त्यावर कोणीच बोलायला तयार नाही. इंधन भाववाढीमुळे महागाई वाढीला लागत आहे. यामुळे समान्य जनता मात्र त्रस्त झाली आहे. 


 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu