Ad Code

#poiltcs अजित दादा- राम शिंदे सरांच्या भेटीत काय ठरले कळेना, शिंदे सर म्हणतात अशी कोणतीही भेट झालेली नाहीराशीन ( जि. नगर) ः कर्जत तालुक्यातील राशीन गावाजवळ असलेल्या अजितदादा पवार यांच्या अंबालिका साखर कारखाना परिसरात उपमुख्यमंत्री अजित दादा पवार व भाजपचे माजी मंत्री व कर्जत-जामखेडचे माजी आमदार राम शिंदे यांच्या शनिवारी दि. 12 गुप्त बैठक झाल्याची जोरदार चर्चचा सुरु आहे. या बैठकीत नेमके काय बोलणं झाले हे बाहेर आलेलं नाही.  बैठक झाली आणि शिंदे यांना आमदारकी मिळणार असल्याची बातमी व्हायरल झाली आणि अहमदनगर जिल्ह्याच्या  राजकारणातील चर्चेला उधाण आलं आहे. अर्थात राम शिंदे यांनी तर बैठक झालीच नाही असं सांगून टाकलय, पण अधिक तपशीलवार बोलणंही त्यांनी टाळलयं.

वाचा ः मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत सरकार काय करणार हे सांगावे ः विनायक मेटे

अदमदनगर जिल्ह्यामधील राजकारण कायम चर्चेत असते. पवार घराणे बारामतीचे असले तरी बारामती जामखेड-कर्जत बारामतीच्या सख्ख्ये शेजारी आहेत. सध्या कर्जत-जामखेडचे आमदार पवार घराण्यातील रोहीतदादा पवार आहेत. या तालुक्यावर पवारांचे कायम विशेष लक्ष राहिलेले आहेत. कर्जत-जामखेडच्या विकासासाठी रोहित पवार व त्यांचे वडील कृषीरत्न राजेंद्रदादा पवार यांनी विशेष लक्ष दिवे आहे. 


कर्जत -जामखेडच्या राजकारणात दहा वर्ष आमदार व पाच वर्ष मंत्री आणि पालकमंत्री असलेले राम शिंदेही सक्रीय आणि वनजदार नेते आहेत. रोहितदादा पवार यांनी राम शिंदे दोन वर्षापुर्वी झालेल्या विधानसभा निवडणूकीत पराभव केला. शिंदे हे माजीमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतील नेते मानले जातात. मात्र अहमदनगरमधील प्रस्थापीत ने्त्यांच्या  राजकारणात शिंदे सध्या पक्षीय राजकारणातून काहीसे बाजुला पडले असल्याचे दिसत आहेत. 

 वाचा ः # politics मला कोणी शिकवायची गरज नाही, संभाजीराजेचा पलटवार

शनिवारी दि. 12 रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार व राम शिंदे यांच्यात राशीनजवळील अंबालिका कारखाना स्थळावर गुप्त बैठक घेऊन चर्चा झाल्याची बातमी फुटली. अनेक वृत्तपत्र, वृत्तवाहिन्यातही बैठकीची बातमी प्रसारीत झाली आणि अहदमनगरर  जिल्ह्यात सध्या शांत असलेले राजकारण अचानक ढवळून निघाले. या बैठकीत  कुठल्या विषयावर चर्चा झाली हे कळू शकले नाही.

 राम शिंदे यांनी तर बैठक झाली नसल्याचे सांगितले. मी पुण्यात होतो. बैठकीच्या  अफवा आहेत असे स्पष्ट केले असले तरी बैठक झाल्याचे काही लोक खात्रीशीर सांगत असल्याने राजकीय जाणकारंना बैठक झाली हे पटेना. राम शिंदे यांना आमदारकी मिळणार अशीची लोकांत दोन दिवसापासून चर्चा आहे. रोहित दादा पवार यांना कर्जत जामखेडमध्ये एकमेव कट्टर आणि ताकदीचे विरोधक असलेले  राम शिंदे यांना राष्ट्रवादीकडून आपलेसे कऱण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे दिसतेय असे लोक चर्चा करत आहेत. असं काही झालेच नाही हे मात्र शिंदे सरांनी सांगून टांकलय. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu