मुंबई ः राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काॅंग्रेस या तिन पक्षाचे सरकार आहे. मात्र काॅंग्रेस सतत स्वबळावर निवडणूक लढवण्याचा नारा देतेय, यावरुन असे दिसतेय की काॅंग्रेस नेत्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कामावर विश्वास नाही. काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सतत स्वबळलाचा नारा देत असल्याने ते स्पष्ट होतेय असा टोला भाजप नेते आमदार राम कदम यांनी लगावला. काॅग्रेस मुख्यमंत्र्यावर नाराज आहे असे ते म्हणाले.
------
वाचा ः मला कोणी शिकवायची गरज नाही, संभाजीराजेचा पलटवार
------
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. त्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काॅंग्रेस असे तीन पक्ष आहेत. मात्र गेल्या काही दिवसापासून काॅंग्रेस आगामी निवडणूका स्वबळावर लढणार असल्याचे सांगत आहे. त्यावर आज एका वृत्तवाहिनीशी बोलताना राम कदम यांनी काॅंग्रेस नेत्यांना टोला मारला आहे.
0 टिप्पण्या