Ad Code

# rain मुंबईत जोरदार सुरु, मराठवाड्यातही जोरदार बरसण्याचा अंदाज
मुंबई ः मुंबईत आज शुक्रवारीही जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे त्यामुळे मुंबई शहरात वेगवेगळ्या भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले. मुंबईसह कोकणातील सर्व जिल्ह्यात पाऊस सुरु आहे. पुढील दोन-तीन दिवस सतर्कतेचा इशारा दिला आहे. पुढील दोन दिवसात मराठवाड्यातील लातुर, बीड, सह अन्य जिल्यातही जोरदार पाऊस पडेल असे हवामान विभागाकडून सांगितले आहे. 


महाराष्ट्रात सर्व भागात मोसमी पाऊस पोचला आहे. दोन ते तीन दिवसापासून सर्वदुर पाऊस सुरु आहे. बुधवारपासून मुंबईत जोरदार पाऊस सुरु आहे. ज्या भागात जास्ती पाऊस झालाय, त्या भागात पाणी साचल्याने लोकांना त्रास सोसावा लागत आहे. कोकणतील सर्वच जिल्हयात पाऊस सुरु असून पुढील तीन दिवस जोरदार पावसाची शक्यता असल्याने सतर्क राहण्याचे सांगितले आहे.

हे ही वाचा  ः आषाढी वारीला यंदाही कोरोनाची अडकाठी, पादुका एसटीतूनच जाणार

सध्या पडत असलेला पाऊस महत्वाचा मानला जात आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात पेरण्या, कापुस लागवड जोमाने सुरवात झाली आहे. खता-बियाणांच्या दुकानात शेतकऱ्यांची लगबग सुरु आहे. मराठवाड्यातील बीड, लातुरसह अन्य जिल्ह्यात पुढील दोन दिवसात वीजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu