Ad Code

# vinayk mete मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत सरकार काय करणार हे सांगावे ः विनायक मेटे

                  

अहमदनगर (प्रतिनिधी)  ‘‘मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत राज्य सरकार नकारात्मक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटण्यासाठी गेले त्यावेळी जीएसटी, मेट्रो रेल्वे, ओबीसी आरक्षण व मराठा आरक्षण असे १४ ते १५ मुद्दे होते. पंतप्रधानांना भेटल्यावर सकारात्मक चर्चा झाली, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाची दिशाभूल केली आहे, असा आरोप शिवसंग्राम पक्षाचे नेते आमदार विनायक मेटे यांनी केला आहे. . 

------

सबंधित बातमी ः मला कोणी शिकायची गरज नाही, संभाजीराजेचा पलटवार

----

आमदार विनायक मेटे यांनी नगरला शासकीय विश्रामगृहावर पत्रकार परिषद घेऊन आगामी आंदोलनाची भूमिका स्पष्ट केली. मेटे म्हणाले, ‘‘बीडमधील मोर्चाने आंदोलनाला सुरवात केली आहे. पाच कायदेपंडितांची समिती स्थापन केली जाईल. ही समिती एक महिन्यात अभ्यास करून सल्ले देईल. त्यानुसार आरक्षण मिळण्यासाठी आगामी काळात वाटचाल असेल. राज्य सरकारचे पावसाळी अधिवेशन सात जुलैला सुरू होणार आहे. तत्पूर्वी पाच जुलैला राज्य शासनाने आरक्षणाबाबत भूमिका घ्यावी, अन्यथा अधिवेशन चालू देणार नाही.’’ 

‘‘आता मूकमोर्चे राहणार नाहीत; सरकारला जाब विचारणारे मोर्चे काढले जाणार आहेत. महसूल विभागीय कार्यालयांवर मोर्चे काढले जातील. त्यानंतर मुंबईला मोर्चा काढला जाईल. समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्‍नाकडे लक्ष वेधण्यासाठी विविध संघर्ष मेळावे जिल्हास्तरावर आयोजित केले जाणार आहेत. दहा हजार दुचाकीस्वारांची फेरी २७ जून रोजी मुंबईत आयोजित केली जाणार आहे. समाजाने आता रस्त्यावरील लढाईसाठी तयार रहा असे मेटे यांनी सांगितले. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu