Ad Code

कृषीमंत्र्याने घेतला भाजी-भाकरीचा आस्वाद, चिमुकल्यालाही घातले जेऊ

धुळे ः राज्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांचा साधेपणा सातत्याने पहायला मिऴत आहे. दादा भुसे यांनी आज शुनिवारी दि. 10 रोजी धुळे जिल्ह्यातील सिंदखेडा जवळच्या हातनुरजवळ एका आदावीसी झोपडीत जाऊन खान्देशी भाजी-भाकरीचा आस्वाद घेतला, यावेळी त्यांनी यावर्षी असलेल्या शेतीच्या अडचणी आणि त्या कुटूंबाच्या समस्येवर चर्चा केली. सोबत तेथील एका चिमुकल्याला आपल्या ताटात जेऊही घातले,. दिवसभर त्याची लोकांत चर्चा होती. (The simplicity of the state's agriculture minister Dadaji Bhuse is constantly being seen. Dada Bhuse went to an Adavisi hut near Hatnur near Sindkheda in Dhule district and tasted Khandeshi vegetables and bread.)

त्याचे असे झाले, राज्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे हे आपल्या अनोख्या प्रयोगामुळे सतत चर्चेत असतात. आज शनिवारी भुसे हे धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यंदा पाऊस कमी आहे. अनेक भागात पेरण्या राहिल्या आहेत. त्यामुळे भुसे हे धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आज बांधावर जाऊन शेतकऱ्यांची विचारपुस करत होते. 

हे ही वाचा ः एक तरुण पुढे आला, त्याच्या प्रयत्नातून आदीवासी शेतकऱ्यांनी कमालच केली,

धुळे जिल्ह्यातील सिंदखेडा येथील दौरा आटोपून भुसे हतनुर नावाच्या गावाजवळून जात असताना अचानक त्यांचा ताफा एका आदीवासी झोपडीजवळ थांबला. दादाजी भुसे यांना भुकही लागलेली होती. ताफा थांबल्यावर झोपडीत जाऊन त्यांनी त्या शेतकरी आदीवासी कुटूंबाशी चर्चा करत व विचारपुस केली. यावेळी भुक लागल्याची भावना व्यक्त केली.

त्यानंतर कुटूंबातील सदस्यांनी केलेल्या विनंतीला मान देत खान्देशी भाजी भाकरीचा आस्वाद घेतला. जेवन करत असताना तेथे असलेल्या एका लहान मुलाला जेवन केले का असे विचारले. ते बालक जेवले नसल्याचे दिसताच भुसे यांनी त्याला त्याच्या ताटात जेऊ घातले. कृषीमंत्री दादाजी भुसे  यांच्या  साधेपणाचा व्हिडीओ सोशल मिडीयावर फिरत असून लोकांतही कृषीमंत्र्याच्या  साधेपणाची चर्चा होत आहे. 

वाचा ः मदतीसाठी सरसावले हात, संकटकाळी मित्रांनी दिला मदतीचा आधार

राज्याचे कृषीमंत्री असताना दादाजी भुसे सतत चर्चेत राहिले आहेत. गेल्यावर्षी युरिया खत मिळत नसल्याची एका शेतकर्याने तक्रार केल्यानतंर भुसे यांनी थेट औरंगाबादला जाऊन शेतकरी वेशात स्टींग आॅपरेशन केले होते. मागील आठवड्यात नगर जिल्ह्यातील नेवासा फाट्यावर अचानक ताफा थांबवून रस्त्याच्या कडेला भुईमुगाच्या ओल्या शेंगा विक्री शेतकऱ्यांची विचारपुस करत शेंगा खरेदी केल्या होत्या. त्याचीही खुप चर्चा झाली.   टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या

Close Menu