मुंबई - रायगड ः गेल्या चार दिवसापासून राज्यातील कोकण, मुंबईत मुसळधार पावसाने धुमाकुळ घातला आहे. पावसामुळे कोकणात मृत्यूचे तांडव सुरु आहे. रायगड जिल्ह्यातील महाड जवळील तळीये गावांवर डोंगर कोसळून 38 लोक गाडले गेले आहेत. साताऱ्यात सहा ठिकाणी दरडी कोसळून व इतर कारणाने 15 ते 25 लोक बेपत्ता आहेत. दोन दिवसात राज्यात पावसामुळे 129 लोकांचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे. (For the last four days, torrential rains have lashed the state of Konkan and Mumbai. Death toll rises in Konkan due to rains In Raigad district, 38 people have been buried in a landslide at Taliye village near Mahad. In Satara, 15 to 25 people are missing due to landslides at six places and other reasons. Rains are estimated to have killed 129 people in the state in two days.) अजूनही मृत्यूचा आकडा वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे. अजूनही दोन दिवस जोरदार पाऊस पडणार असल्याचा हवामान विभागाने अंदाज सांगितल्याने धास्ती वाढली आहे. गेल्या वर्षभरात दोन गंभीर वादळाच्या संकटातून सावरत असतानाच पुन्हा यंदाच्या पावसाने नवे गंभीर संकट उभे केले आहे.
कोकणाला महापुर, अतीवृष्टीने धुमाकुळ घातला आहे. चार दिवसापासून पावसामुळे मुंबई, कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापुर, सातारा, सांगली जिल्हयातील जनता अक्षरशः हवालदिल झाली आहे. शेतीपिकांचे तर मोठे नुकसान झाले आहेच, पण दरडी कोसळल्याने तब्बल 129 लोकांना आतापर्यत दोन दिवसात जीव गमवावे लागले आहेत. रायगडच्या महाडजवळील तळीये या गावांवर काल दुपारी चार वाजता दरड कोसळून आतापर्यत 38 लोकांचा मृत्यू झाल्याची प्राथामिक माहिती आहे.
रायगड जिल्ह्यात चार जिल्ह्यात दरडी कोसळल्या आहेत, साताऱ्यात पाच ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत. सातााऱ्यात जवळपास पंधरा पेक्षा अधिक लोकांचा यात मृत्य झाला आहे. दरडी कोसळलेल्या भागात अजूनही अनेक बचाव पथके पोचले नाहीत. दुर्घटना स्थळी मंत्री आदित्य ठाकरे, विधान परिषदेतील विरोधीपक्ष नेते प्रविण दरेकर, माजीमंत्री गिरीष महाजन, आमदार आदिती तटकरे यांच्यासह नेत्यांनी कोकणाकडे धाव घेतली आहे. चिपळूनात कोवीड सेेटरमध्ये पाणी घुसल्याने आठ लोकांचा मृत्यू झाला आहे.
जागोजागी रस्ते खचले असल्याने एनडीआऱएफ च्या पथकानाला पोचायला उशिर होत असल्याचे सांगितले जात आहे. गावांती कुटूंबेच्या कुटूंबे दरडी खाली दाबली गेल्याने नातेवाईकांचा आक्रोश जीव पिळवटून टाकणारा आहे. रत्नगिरीतही काही भागात दरडी कोसळून लोक गाडले गेले आहेत. आतापर्यत मिळालेल्या माहितीनुसार, रायगडमधील तळीये येथे 38, रत्नागिरीतील पोसरे येथे 17, साताऱ्यातील आंबेघर येथे 12, रायगडमधील पोलादपुर येथे 11, चिपळूमधील कोविड सेंटरमध्ये 8, साताऱ्यातील वाईत 2, व सिंधुदुर्गातील दिगवळे येथे एक मृत्यू झाल्याची माहीती आहे.
सांगली, सातारा, कोल्हापुर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, पुणे, नांदेड, धुळे, नागपुर, अमरावती, चंद्रपुर, भंडारा जिल्ह्यात जोरदार पाऊस असल्याने प्रमुख नद्याला पुर आला आहे. अजूनही दोन दिवस जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त् केला जात असल्याने कोकण, मुंबईसह पाऊस सुरु असलेल्या जिल्ह्यात धास्ती वाढली आहे.
----
अनेकांचे हाथ सरसावले
कोकण, कोल्हापुर, सातारा, पुणे भागात पावसाने दाणादाण उडवलीय. पाणीच, पाणी दरड कोसळतेय अशा अडचणीत हजारो लोक अडकलेत. त्यांना मदतीचा हाथ देण्यासाठी सरकारी यंत्रणेतील अधिकारी, कर्मचारी,सेवक, जवान यांच्यासह स्थानिक कार्यकर्ते सरसावले आहेत. रत्नागिरी, रायगडमधील दरड कोसळलेल्या गावांत जेवढे जीव वाचवता येतील तेवढा अविरत प्रयत्न सुरु आहे. याआधी काही वर्षापुर्वी पुण्यातील आंबेगाव तालुक्यात माळीन गावांत अशीच दुर्घटना घडली होती.
------
0 टिप्पण्या