Ad Code

# Bury the village under the floor in the pond तळिये गाव दरडीखाली गाडले ः जड अंतकरणाने बेपत्ता नागरिक मृत घोषीत


महाड ः तळीये (ता. महाड)  येथे दरड कोसळून 84 लोकांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. त्यातील 53 मृतदेह सापडले. मात्र घटना घडून चार दिवसाचा कासावधी उलटला. आता मलब्याखाली कोणी जिवंत असण्याची शक्यता नाही. जास्ती दिवसाचा कालावधी झाल्याने शोधमोहिमेत मृतदेहाची अवहेलना होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे होते. त्यामुळे उर्वरित लोकांचे मृतदेहाची शोध मोहिम थांबली आणि 31 लोकांना जड अंतःकरणाने मृत घोषीत केले आहे आणि एनडीआऱएफच्या टीमने रेस्क्यु आॅपरेशन थांबवले आहे असे जिल्हा प्रशासनाकडून जाहीर केले आहे. (The district administration has declared that the rescue operation has been stopped by the NDRF team with a heavy heart.)

हे वाचा ः # Korona भारतात 91 हजार कुटूंबाची कोरोनामुळे वाताहत, कर्ते पुरुष गेले

महाड तालुक्यातील तळिये गाव डोंगरकपारीला निसर्गाच्या सानिध्यात वसलेले. कित्येक वर्ष ज्या निसर्गात राहिलेल्या गावांवर 22 जुलै रोजी त्याच निसर्गाने घाला घातला. गावांवर डोंगर कोसळला आणि  काही काळायच्या आत 35 घरांतील 84 लोक डोंगराच्या दगड-माती खाली दाबले गेले. मुसळधार पाऊस असल्याने येथे सरकारी मदत पोचालयाही उशिर झाला. स्थानिक गावकरी आणि इतरांच्या मदतीने काही नागरिकांना सुदैवाने 5 जखमी आवस्थेत बाहेर काढून वाचवण्यात यश आले. 

चार-पाच दिवसाच्या  कालावधीत एनडीआरएफ, स्थानिक नागरिक व अन्य यंत्रणाच्या मदतीने 53 लोकांचे मृतदेह बाहेर काढले. मात्र आता जास्ती दिवसाचा कालावधी झाला आहे. त्यामुळे मलब्याखाली कोणी जिवंत असण्याची शक्यता  नाही. शिवाय मृतदेह शोधताना जास्ती दिवसाच्या  कालावधीमुळे अवयवाचे भाग तुटून येत आहेत. त्यामुळे रेस्क्यु आॅपेरेशन थांबवा, आमचा काहीही आक्षेप राहणार नाही. असे गावकऱ्यांनी तसेच मृताच्या नातेवाईकांनी सांगिल्याने कालपासून मृतदेह शोधण्याचे  रेस्क्यु आॅपरेशन थांबवत 31 लोकांना मृत घोषीत केले आहे. 

तळिये दरड कोसळण्याच्या  दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांचा अक्रोश थांबत नाहीत. मृतात 1 वर्ष वयापासून 80 वृद्धापर्यतचा समावेश आहे. सातारा, सांगली, रत्नागिरी जिल्ह्यातही दरडी कोसण्याच्या अचानक झालेल्या घटनांनी साऱ्या महाराष्ट्रात हळहळ व्यक्त होत आहे.. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापुर, सातारा, सांगली जिल्ह्यात पुरामुळे नुकसान झाल्याने हतबल झालेल्या लोकांना महाराष्ट्रातील विविध भागातून मदतीचा हाथ दिला जात आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu