Ad Code

# Silk farming जिद्दीने सुरु केलेली प्रशांत लगड यांची यशस्वी रेशीम शेती

                                     

नगर जिल्ह्यातील कोळगाव ता. श्रीगोंदा येथील प्रशांत पांडूरंग लगड यांनी शेतीला पुरक व्यवसाय म्हणून रेशीम व्यवसाय सुरु केला. त्यासाठी त्यांनी पहिल्या वर्षी एक एकर व दुसऱया वर्षी एक एकर तुतीची लागवड केली. चार वर्षापासून रेशीन व्यवसायात यश मिळवत आर्थिक प्रगती साधली. शेतीतही लिंबू, ऊसाचे उत्पादन घेऊन शेती सोपी करण्याचा त्याचा प्रयत्न दिसत आहे. ( Kolgaon taluka in Nagar district. Prashant Pandurang Lagad from Shrigonda started a silk business as a supplementary business to agriculture. For this, they planted one acre of mulberry in the first year and one acre in the second year. Succeeded in the resin business for two years and made economic progress. He is also trying to make farming easier by taking the production of lemon and sugarcane.)

शेतीतच दाखवला रस 

नगर जिल्ह्यामधील कोळगाव परिसरात पाण्याची चांगली उलब्धता. त्यामुळे या भागात शेतकरी ऊसासह इतर नगदी पीके घेतात. लिंबाचीही या भागात लागवड केलेली आहे. येथील प्रशांत पांडूरंग लगड यांना वडिलोपार्जीत दहा एकर शेती. त्यांचा अभियांत्रिकी डिप्लोमाचे शिक्षण झाले आहे. वीस वर्षापुर्वी शिक्षण झाले आणि काही दिवसात वडीलांचे निधन झाले. त्यामुळे प्रशांत यांनी नोकरी न करता शेतीच करण्याचा निर्णय़ घेतला. दहा शेतीत शेतीत ऊस, लिंबू यासह इतर पीके असतात. त्यांनी पत्नी रस दाखवला. सध्या त्यांच्याकडे पाच एकर ऊस, दोन एकर लिंबाची बाग आहे. बारामाही पीक म्हणून लिंबाकडे पाहिले जाते. वर्षभरातून लिंबू उत्पादनातून साधारण दोन ते तीन लाखाचे आर्थिक उत्पन्न मिळते. लिंबाची स्थानिक बाजारात विक्री करतात.   

 हे वाचा ः एक तरुण पुढे आला, त्याच्या प्रयत्नातून आदीवासी शेतकऱ्यांनी कमालच केली,

मित्राच्या मार्गदर्शनाने रेशीम व्यवसाय 

प्रशांत यांनी शेतीला जोड म्हणून पुरक व्यवसाय सुरु करण्याचा निश्चय केला. त्याचे काष्टी (ता. श्रीगोंदा) येथील अविनाश धामणे मित्र साधारण पंधरा वर्षापासुन रेशीम व्यवसाय करतात. याशिवाय त्यांनी पुणे जिल्ह्यातील काही ठिकाणी जाऊन रेशीम व्यवसायाची पाहणी केली आणि रेशीम व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार दोन पुर्वी अंडीपुंजी ठेवण्यासाठी साडेतीन लाख रुपये खर्च करुन शेड उभारले. लोणी (ता. राहाता) येथून रोपे आणून एक एकरवर तुतीची लागवड केली. पहिल्या वर्षी चांगले रेशीम उत्पादन घेतल्यानंतर यंदा त्यात वाढ करुन दोन एकरावर तुतीची लागवड केली आहे. 

हे वाचा  ः #Chandan farming जबरदस्त, गाडेकरांनी लावलेय सत्तावीस एकरावर चंदन

एक एकरपासून एक हजार किलो रेशीम 

प्रशांत लगड यांनी पहिल्या वर्षी एका एकरावर केलेल्या तुती लागवडीपासून वर्षभरात चार टप्प्यात सुमारे  हजार किलो रेशीमचे उत्पादन  घेतले. त्यासाठी त्यांना मजुरी एक लाख रुपये खर्च आला. खर्च वजा जाता त्यांना निव्वळ साधारण तीन ते साडेलाख रुपये उत्पन्न मिळाले. चार वर्षापासुन आता त्यांनी रेशीनची यशस्वीपणे विक्री केली आहे.  मजुराची सध्या सातत्याने टंचाई जाणवते, मात्र प्रशांत यांना आई शोभा व पत्नी सुप्रिया हे रेशीम उत्पादनासह शेत कामाला मदत करतात. याशिवाय प्रत्येक रेशीम उत्पादन टप्प्यात दोन ते तीन मजुर बाहेरचे लावतात.

आडीचशे ते साडे तीनशे रुपये प्रती किलोने विक्री

शेतकऱयांना रेशीमाची विक्री करण्यासाठी जवळच असलेल्या बारामती तसेच जालना येथे बाजार उपलब्ध आहे. याशिवाय स्थानिक पातळीवरही रेशीम खरेदी कऱणारे व्यापारी येतात. प्रशांत यांनी रेशीम उत्पादन घेतलेल्या रेशमाची आतापर्यत शक्यतो बारामती बाजारातच विक्री केली आहे. त्यांना सरासरी आडीचशे ते साडेतीनशे रुपये किलोचा दर मिळाला आहे. चार वर्षापासून ते रेशीमची विक्री करतात. वर्षभरात एक हजार ते बाराशे किलो रेशीम निघते. आता त्यांनी दोन एकरावर तुतीची लागवड केली आहे. 

प्रशांत उच्च शिक्षित असले तरी ते शेतीत राबूनच आर्थिक प्रगती साधण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी स्वतःच्या शेती कामासाठी सहा वर्षापुर्वी पाच लाख रुपये खर्च करुन करुन टॅंक्टर खरेदी केला आहे. त्याच टॅक्टरच्या मदतीने घरच्या शेतीसह बाहेरही रोजंदारीने टॅंक्टरने कामे करतात. त्यातून त्यांना वर्षाला दोन ते तीन लाखाचा आर्थिक हातभार लागतो.   

दुध व्यवसाय, भाजीपाला लागवडीचाही प्रयोग 

प्रशांत यांनी शेतीत दुध पालन तसेच भाजीपाला लागवडीचे प्रयोग केले. त्यांनी वीस वर्षापुर्वी सोळा संकरित गाईंचे पालन करुन सात वर्ष दुध व्यवसाय केला. मात्र दुध व्यवसायासाठी मजुरांची टंचाई आणि दुधाला मिळत असलेला दर परवडत नसल्याने दुध व्यवसाय बंद केला. त्यानंतर त्यांनी दोन ते तीन एकरावर सहा वर्षापुर्वी वेगवेगळ्या या भाजीपाल्याची लागवड करुन साधारण तीन वर्ष भाजीपाला उत्पादनही घेतले. मात्र मजुरांची टंचाईमुळे त्यांनी भाजीपाला उत्पादनही घेणे बंद केले.

असे घेतले जाते रेशीम उत्पादन 

अंडपुंज  आणल्यानंतर त्याना जन्म करण्यासाठी ब्लाॅक बाॅक्सींग करुन साधारण दोन ते तीन दिवस ठेवले जाते. त्यानंतर जन्मझाल्यानंतर त्याला खाण्यासाठी पाला टाकायला सुरवात केली जाते. हा पाला चुरा केलेला सहा ते सात दिवस खातात. याकाळात  ते त्यासाठी केलेल्या  स्वतंत्र खोलीत ठेवले जाते. दुसरी आवस्था झाल्यानंतर त्यांना सातव्या किंवा आठव्या दिवशी त्याच्यासाठी उभारलेल्या शेडमध्ये नेले जाते. त्या काळातील थेट पाला कापुन टाकला जातो. साधारण पंधरा ते सोळा दिवस आळीची मोठी आवस्था असते.  नंतर शेवटच्या सात दिवस झाल्यानंतर  चौथ्या आवस्थेत 75 टक्के तुती चारा लागतो.  त्यानंतर आळी  कोषावर जाते व त्यानंतर चंद्रीका (जाळी) टाकल्यावर आळी रेशीम कोष तयार करते. त्यानंतर तीन दिवसानंतर तयार झालेले रेशीम गोळा करायला सुरवात करतात.

प्रतिक्रिया 

शेतीला पुरक म्हणून रेशीम व्यवसाय चांगला फायदेशीर आहे. एका एकरापासून साधारण तीन ते साडे लाख रुपये उत्पन्न मिळते. य़ाशिवाय नुकसानीची धोका कमी आहे. जिद्दीने आणि चिकाटीने हा व्यवसाय केला तर निश्चित प्रगती साधता येते.

                  संपर्क ः  प्रशांत पांडूरंग लगड,  मो. 9881981054


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu