Ad Code

कृषी विद्यापीठाचा सल्ला, अशी घ्या जनावरांची काळजी


महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी ः पावसाळ्यात जनावरे सुरक्षित ठिकाणी बांधावीतपशुपालकांनी आपल्या भागात कोणत्या प्रकारचे जंत आहेत याची माहिती करून घ्यावी. जंतांचे प्रकार जाणून घेण्यासाठी जनावरांच्या शेणाची तपासणी करून घ्यावी. जंतांचे प्रकार समजल्यावर पशुवैद्यकाच्या सहाय्याने नियंत्रणासाठी व प्रमतिंधात्मक उपायांसाठी उपयुक्त व प्रभावी औषधे निवडावे. जनावरांची रोग प्रतिकारशक्ती वाढवावी. जेणेकरून जंतांच्या वाढीला आळा बसतो. त्यांचे नियंत्रण होते. याकरिता जनावरांना उत्तम संतुलित आहार द्यावा. जनावरांचा गोठा स्वच्छकोरडा व हवेशीर ठेवणे व वेळोवेळी निर्जंतुकीकरण करणे महत्त्वाचे आहे. औषधे देतांना औषध योग्य मात्रेतच द्यावे त्याकरता वेष्टनावरील सूचना पाळाव्यात असा सल्ला महात्मा फुले कृषी विद्यापीठाने दिला आहे. (Animals should be kept in a safe place during the rainy season. Pastoralists should find out what kind of worms are in their area. Animal dung should be examined to know the types of worms.)

वाचा ः कृषीमंत्र्याने घेतला भाजी-भाकरीचा आस्वाद, चिमुकल्यालाही घातले जेऊ

पुढील पाच दिवस आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे तसेच पुढील पाच दिवस काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतीचे कामे करताना कामगाराना ४ ते ५ फुटाचा पट्टा वाटून दिल्यास काम पण योग्य होइल आणि योग्य सामाजिक अंतरही ठेवले जाईलशेती यंत्रे निर्जंतुकीकरण करावीततोंडाला मास्क अथवा कापड गुडाळावे.  हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्ला व हवामानचा पूर्वानुमानाकरीता मेघदुत मोबाईल अॅपचा वापर करावा. वीजेच्या अंदाजाचा पूर्वानुमानाकरीता दामिनी मोबाईल अॅपचा वापर करावा.


ज्या भागात पेरणी राहिली आहे त्याठिकाणी पेरणी बाकी असेल तेथे पेरणी योग्य पाऊस (८० ते १०० मिमीझाल्यानतरच वाफसा आल्यावर खरीप पिकाची (मुग, उडीद वगळतापेरणी करण्यात यावी. ज्वारी / मका (२५० ग्रॅम/ हेक्टर) हे मिश्र पीक घ्यावे म्हणजे त्याचा सजीव पक्षीथांबे म्हणून उपयोग होतो तसेच किडीच्या नैसर्गिक शत्रू किटकांची जोपासना होण्यास मदत होते, फळातील रस शोषणाऱ्या पतंगाचे व्यवस्थापन करताना बागेच्या सभोवती बांधावरील किंवा नदीनाल्यांच्या किनाऱ्यावरील पावसाळ्यात तयार होणार्‍या अळीला पूरक असणार्‍या वनस्पतींचा नायनाट करावा, 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu