Ad Code

सूर्यकांत शेकडे यांनी शेतकरी हिताचे काम केले, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकाऱ्यांकडून कौतुक

                                   

                      सूर्यकांत शेकडे साहेब यांचा सत्कार करताना  शिवाजारीव जगताप साहेब 

बीड (प्रतिनिधी)  ः कृषी विभागातील प्रत्येकांचीच शेतकऱ्यांशी नाळ जोडलेली आहे. कृषी कर्मचारी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पोहोचला आहे. ते शेतकरी कुटुंबातील असल्याने त्यांच्या मनात शेतकऱ्यांप्रती आदरभाव आहे. कृषी अधिकारी व कर्मचारी यांच्यात सांघिक भावना आहे, सूर्यकांत शेकडे यांनी   आपल्या सेवा काळात समाजाचे, शेतकऱ्यांचे हित जोपासले असे अहमदनगर येथील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजीराव जगताप यांनी सांगितले. 

अहमदनगर येथील मंडल कृषी अधिकारी सूर्यकांत शेकडे 37 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले. याबद्दल त्यांचा आहमदनगर  कृषी विभागातर्फे जगताप यांच्या हस्ते सपत्नीक सन्मान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी कृषी उपसंचालक विलास नलगे, उपविभागीय कृषी अधिकारी गहिनीनाथ कापसे, तालुका कृषी अधिकारी पोपटराव नवले, तंत्र अधिकारी अशोक डमाळे, विजय सोमवंशी, जालिंदर गांगर्डे, संजय मेहेत्रे, रवींद्र माळी, अंकुश टकले, जगदीश तुंभारे आदींसह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी कृषी सहाय्यक रमेश गोसावी, कृषी चिकित्सालयातील परिचर भाऊसाहेब दातीर यांचाही सेवानिवृत्तीबद्दल सपत्नीक सत्कार करण्यात आला.जालिंदर गांगर्डे यांनी सूत्रसंचालन केले, संजय मेहेत्रे यांनी आभार मानले. 

हे ही वाचा ः मदतीसाठी सरसावले हात, संकटकाळी मित्रांनी दिला मदतीचा आधार

यावेळी बोलतानाा सूर्यकांत शेकडे साहेब म्हणाले, मी शासकीय सेवेत दि.30/07/1984साली तालुका कृषी अधिकारी, पाटोदा येथे कषी पर्यवेक्षक पदावर हजर झालो. त्यानंतर आष्टी, बीड,माजलगाव,बीड,शिरूर (कासार) येथे कषी पर्यवेक्षक,व कषी अधिकारी म्हणुन काम केले. पदोन्नती मिळाले नंतर तालुका कषी अधिकारी अंतर्गत मंडळ कषी अधिकारी बीड  येथे सन2008ते सन2013पर्यंत काम केले.त्यानंतर तालुका कषी अधिकारी आष्टी अंतर्गत मंडळ कषी अधिकारी म्हणुन सन 2018पर्यंत काम केले.शेवटी सेवानिवृत्ती जवळ आल्या मुळे तालुका कषी अधिकारी अहमदनगर अंतर्गत मंडळ कषी अधिकारी जेऊर येथे काम करून दि.30जुन 2021 ला सेवेतुन कार्यमुक्त झालो. मी शेतकरी हित समोर ठेवून काम केले. त्याचे मला खुप समाधान मिळत आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu