Ad Code

आता हिरव्या बुरशीचा धोका, मुंबईत आढळले रुग्णमुंबई ः कोरोना झाल्यानंतर काळ्या बुरशीची (म्युकरमायकोसीस) बाधा झाल्याचे आतापर्यत दिसत होते. मात्र आता चक्क हिरव्या बुरशीचीही बधा होत असल्याचे दिसत आहे. कोरोनाातून बऱे झालेल्यांना मुंबईत हिरव्या बुरशीची (म्युकरमायकोसीस) लागण झाली असून 8 रुग्णांवर उपचार सुरु असल्याचे सांगितले जात आहे. काळजी घेतली तर धोकेदायक नाही असे डाॅक्टरांनी सांगितले आहे. 

गेल्या दिड वर्षापासून राज्यात कोरोना आलेला आहे. गेल्यावर्षीपेक्षा यंदाच्या दुसऱ्या लाटेत कोरोनाने धुमाकुळ घातला आहे. यावेळी कोरोनामुळे बाधित होण्याचे प्रमाण अधिक राहिले आहे. मात्र यावेळीच्या लाटेत कोरोनातून बरे झालेल्या काही रुग्णांना काळ्या बुरशीची (म्युकरमायकोसीस) लागण झाल्याचे दिसून आले. त्यानंतर पिवळी व पांढरी बुरशी झाल्याचेही काही उदाहरणे राज्यात पहायला मिळाले.  

हे ही वाचा ः मदतीसाठी सरसावले हात, संकटकाळी मित्रांनी दिला मदतीचा आधार

आता हिरव्या बुरशीचा धोका निर्माण झाला आहे. एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार मुंबईत हिरव्या बुरशीची लागण झालेले रुग्ण आढळून आले असून  केईएम रुग्णालयात हिरव्या बुरशीची लागण झालेल्या 8 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. या बुरशीची लागण झालेल्या रुग्णांच्या फुफुसात पोकळी निर्माण करते व जाळं तयार करते. त्यामुळे खोकल्यातून रक्त येण्यासारखे प्रकार होतात. दुर्लक्ष झाले तेर फुफुस निकामी करतो. हिरवी बुरशी धोकादायक असली तरी काळजी घेतली तर काहीही काळजी करण्याचे कारण नाही असे डाॅक्टरांनी सांगितले आहे. 

दरम्याण नागपुरात म्युकरमाकोसीस धोका वाढला आहे. येथे मृत्यूदाराचे प्रमाण अधिक आहे. साडेसोळाशे लोकांना धोका, बाराशेच्यावर रुग्णांवर शस्त्रक्रिया केली असल्याचे सांगण्यात येत आहे. टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu