Ad Code

# corona शिरुर कासार तालुक्यात 42 कोरोना बाधित आढळले. प्रशासनाने तातडीने नियम बदलले

बीड ः कोरोना ची दुसरी लाट कमी झाल्यानंतर लोक बिनधास्त झाले. त्याचा परिणाम दिसू लागले आहेत. बीड जिल्ह्यातील शिरुर कासार तालुक्यात मंगळवारी दि. 20 जुलै रोजी कोरोनाचा विस्फोट पहायला मिळाला. जिल्हाभरात 211 कोरोना बाधित सापडले. त्यातील एकट्या शिरुर कासार तालुक्यात 42 रुग्ण कोरोना बाधित आहेत. अचानक रुग्णसंख्या वाढली असल्याने बीड जिल्हा प्रशासनाने तातडीने दैनंदिन नियम बदलले आहे. आष्टी तालुक्यातही रुग्णसंख्येत कमालीची वाढ झाली आहे. गुरुवार दि. 22 पासून ते बुधवार दि. 28 जुलैपर्यत जिल्हा प्रशासनाने दैनंदिन अस्थापनेसाठी नवे नियम लागू केले आहेत. (In Shirur Kasar taluka, 42 patients are infected with corona. Due to the sudden increase in the number of patients, the Beed district administration has immediately changed the daily rules. The number of patients in Ashti taluka has also increased dramatically. On thursday From 22 to Wednesday. Until July 28, the district administration has implemented new rules for daily establishments.)

बीड जिल्ह्यात मंगळवारी दि. 20 जुलै रोजी अंबाजोगाई तालुक्यात 10, आष्टी तालुक्यात 43, बीड शहरात 36, धारुर तालुक्यात 5, गेवराई तालुक्यात 14, केजमध्ये 10, माजलगावात 5, परळी 1, पाटोद्यात 28, शिरुर कासारमध्ये 42, वडवणीत 17 रुग्ण आढळले आहेत. जिल्हाभरात एकुन 211 बाधिक आढळले आहेत. काल दि. 19 जुलैरोजी सोमवारी हा आकडा 113 होता.

हे वाचा ः # Chief Minister Uddhav Thackeray पंढरीत भक्तीसागर भरु दे, मुख्यमंत्र्याचे विठ्ठलाला साकडे

कोरोनाची दुसरी लाट कमी झाल्यानंतर बीड जिल्ह्यात रुग्ण कमी होऊन दोनशेच्या आत आली होती. काल सोमवारी दि. 19 रोजी 113 रुग्णसंख्या आढळली. त्यात शिरुर कासार तालुक्यात 10 जण कोरोनाबाधित आढळले. मात्र सोमवार दि. 20 रोजी शिरुर कासार तालुक्यात तब्बल 42 बाधित आढळले असल्याने जिल्हा प्रशासन सावध झाले असून जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण प्रमुखांनी तातडीने दैनंदिन नियम बदलले आहेत. गुरुवार दि. 22 पासून ते बुधवार दि. 28 जुलैपर्यत हे नियम लागू राहणार आहेत. 

हे वाचा ः # MLA Suresh Dhas आमदार सुरेश धस यांचे कार्यकर्त्यांवर असेही प्रेम, विचारपुस करण्यासाठी बैलगाडीतून गाठले घर

शिरुर कासार तालुक्यात ग्रामीण व शहरी भागात कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने आत्यावश्यक सेवांच्या पुरवठा सबंधित अस्थापना उघडण्याचा कालावधी सोमवार ते रविवार सकाळी 7 ते दुपारी साडे बारा असा करण्यात आला आहे. आतापर्यत या तालुक्यात दुपारी चार वाजेपर्यत दुकाने,अस्थापना चालु ठेवण्याचा हा नियम लागू होता.  त्यानंतर केवळ अत्यावश्यक सेवांसाठीच प्रवास करता येईल. शनिवारी व रविवारी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व सेवा, दुकाने बंद असतील. नियम मोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. जेथे रुग्णसंख्या अधिक आहे त्या गाव, वस्ती, वाडीवर कॅन्टोमेंट झोन करण्याबाबत स्थानिक अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu