Ad Code

# corona काही होत नाही म्हणणाऱ्यांनो सावधान, कोरोना वाढतोय, दोन दिवसात रुग्णसंख्येत वाढ

पुणे ः कोरोना ची दुसरी लाट कमी झाल्यानंतर काही होत नाही असे म्हणत बिनधास्त झालेल्यांसाठी धोक्याची घंटा आहे. तिसरी लाट येणाऱ असल्याचे आरोग्य विभाग सांगत आहे. त्याची सुरवात तर झाली नाही ना असे प्रश्न आता उपस्थित होऊ लागले आहेत. कारण गेल्या दोन दिवसात राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे बिनधास्त होऊन भटकंती करणाऱ्या नागरिकांनी काळजी घेतली नाही तर ते इतरांसाठीही घातक ठरणार असल्याचे  दिसून येत आहे. 


दिड वर्षापासून कोरोना व्हायरस आला आहे. यंदा दुसरी लाट येऊन गेली. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात अजून दुसरी लाट कायम आहे. तेथील रुग्णसंख्या कमी व्हायला तयार नाही. आतापर्यत दिड वर्षात 4 कोटी 54 लाख 82 हजार लोकांची कोरोना तपासणी झाली. त्यातील 62 लाख 15 हजार लोकांना कोरोनाची बाधा झाली. राज्यातील एकून लोकसंख्येच्या 13.66 टक्के लोकांना आतापर्यत कोरोना झाला आहे. आतापर्यत 59 लाख 81 हजार लोक या आजारातून बरे झाले. आतापर्यत 1 लाख 27 हजारापेक्षा अधिक लोकांचा यात मृत्यू झाला आहे. 

हे वाचा ः #Kharif crop insurance खरिप पीकविमा भरण्याला अजून संधी, व्हा सहभागी

आज दि. 19 जुलैपर्यत राज्यात  सुमारे 1 लाख 3 हजारापेक्षा अधिक रुग्ण अॅक्टीव आहे. दुसऱ्या लाटेचा प्रभाव कमी झाल्यानंतर लोक बिनधास्तपणे फिरु लागले आहेत. प्रशासनाने अजूनही लाॅकडाऊनचे काही निर्बंध कायम ठेवले आहेत. असे असले तरी बहूतांश लोक कोरोनाबाबत काळजी घेत नसल्याचे दिसून येत आहे. खास करुन पर्यटन, प्रवास करण्यावर लोकांचा भर आहे. लोकांनी काळजी घेतली नाही तर तिसरी लाट येईल आणि तिचा प्रभाव अधिक असेल. 

हे वाचा ः # korona डेल्टा प्लस व्हेरियंट अती धोकादायक, जागतीक आरोग्य संघटनेचा इशारा

कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसऱी लाट तीव्र होती. त्यात मृत्यूचे प्रमाण अधिक होते हे राज्यातील लोकांनी अनुभवलेले असूनही लोकांतील बिनधास्तपणा जात नसल्याचे दिसत आहे. दुसऱ्या लाटेतील रुग्णसंख्या कमी झाल्यानंतर आता दोन दिवसापासून कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. काल रविवार दि. 18 रोजी राज्यात 9 हजार रुग्ण बाधित निघाले. त्यात नगर, बीड, नंदुरबार, पुणे, सातारा, सोलापुर, कोल्हापुर, सांगली जिल्ह्यात रुग्णसंख्या अधिक आहे. अन्य जिल्ह्यातही हळूवारपणे रुग्णसंख्या वाढत आहे. दिवसभरात 180 मृत्यू झाल्याची  प्रशासनाकडे नोंद आहे. त्यामुळे काही होत नाही, आता कोरोना गेला असे म्हणत फिरणाऱ्यांना ही धोक्याची घंटा आहे. दरम्याण रुग्ण वाढत असल्याने प्रशासनही सतर्क झाले आहे. 

----------------


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu