मुंबई , ः खरिप पिकांचा पीक विमा भरण्यासाठी पंतप्रधान पीकविमा योजने राबवली जात आहे. त्या अंतर्गत अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ संपल्यानंतर आता पुन्हा राज्य सरकारने केलेल्या विनंतीनुसार शेतकरी हितासाठी विशेष बाब म्हणून केंद्रीय कृषी मंत्रालयाने शुक्रवार दि. २३ पर्यंतची मुदतवाढ दिली आहे. त्याबाबत केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण, सहकार मंत्रालयाने राज्याच्या कृषी सचिवांना काल दि. 15 रोजी गुरुवारी पत्र देऊन कळवले आहे. (The Prime Minister's Crop Insurance Scheme is being implemented to provide crop insurance for kharif crops. As per the request made by the state government again after the extension of deadline for filling up the application, the Union Ministry of Agriculture on Friday issued a special order in the interest of the farmers. Up to 23 extensions have been given.)
राज्यात यावर्षीच्या खरीप हंगामात पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांना गुरुवार दि. 15 जुलैपर्यत पर्यंतची अंतिम मुदत दिली होती. परंतु कोरोनाचे निर्बंध, लांबलेल्या पेरण्या, सर्व्हर डाउन, ग्रामीण भागात इंटरनेट कनेक्टिव्हिटीचा अभाव आदी कारणांमुळे राज्याच्या अनेक भागांतील शेतकऱ्यांना विहित मुदतीत विमा अर्ज सादर करणे शक्य झाले नाही. त्यामुळे या योजनेतील शेतकरी सहभाग वाढविण्यासाठी विमा सादर करण्याकरिता शुक्रवार आता दि. 23 रोजी पर्यत मुदतवाढ देण्याची विनंती महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारच्या कृषी मंत्रालयाकडे केली होती.
महाराष्ट्र राज्यात पीकविमा योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या सहा कंपन्यांनी त्यासाठी संमती दिली होती. त्यानुसार शेतकऱ्यांच्या हितासाठी पीकविमा प्रस्ताव सादर करण्यासाठी शुक्रवार दि. 23 जुलैपर्यत मुदत वाढवून देण्यात आली आहे. त्याबाबत राज्याचे कृषी सचिव तसेच विमा कंपन्यांना कळविण्यात आले आहे. पीक विमा संरक्षित करण्यासाठी जास्तीतजास्त शेतकऱ्यांनी जनसुविधा केंद्र (सीएससी), बॅंकांमार्फत विमा प्रस्ताव सादर करावे, असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे. दरम्याण राज्यात अनेक शेतकरी पीकविमा योजनेत सहभागी व्हायचे रहायचे राहिले होते. त्यांना आता सहभागी होता येणार आहे.
0 टिप्पण्या