मुंबई ः कोरोना संसर्गामुळे दोन्ही लाटेत अनेकांना हे जग सोडून जावे लागले. कुटूंबातील कर्ते पुरुष गेल्याने अनेक कुटूंबाची वाताहत झाली.जगप्रसिद्ध Lancet या मासिकाने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार 91 हजार कुटूंबातील कर्ते पुरुषांचा मृत्यू झाले आहेत. महाराष्ठ्रातील हा आकडा वीस हजाराच्या वर आहे. कोरोना एकल महिला पुनवर्सन महिला समिती केली असून ज्येष्ठ समाजीक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांच्यासह विविध संस्था, समाजीक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला आहे. (Corona has formed a single women's rehabilitation women's committee and various social organizations, including senior social activist Heramba Kulkarni, have taken the initiative.)
देशात व जगात कोरोनाची तिसरी लाट येऊ पाहत आहे. मात्र याआधी झालेल्या दोन्ही लाटेतच मोठी हाणी झाली आहे. अगदी मोठ्या शहरापासून गावखेड्यापर्यत कोरोनाची झळ पोचली. वाडी, वस्ती, तांडयांपर्यत मृत्यूचा आकडा पोचला. यात अनेक कुटूूंबातील पती-पत्नी, काही कुटूंबातील पती तर कुटूंबातील पत्नीचा कोरोनाने मृत्यू झाल्याचे पहायला मिळत आहे. ज्या कुटूंबातील पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झालेल्या कुटूंबातील मुले अनाथ झाली आहे.जगप्रसिद्ध Lancet या मासिकाने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार जगातील 21 देशात 11 लाख 34 हजार मुले अनाथ झाली आहेत. भारतातील हा आकडा 1 लाख 16 हजार आहे.पतीचा मृत्यू झाल्याने देशात 91 हजार महिला विधवा झाल्या आहेत. महाराष्ट्रात हा आकडा सर्वाधिक असून तो वीस हजाराच्या जवळ आहे. ज्यांच्या घरात लहाण मुले आहेत, त्यांचीच ही संख्या असल्याचे हेरंब कुलकर्णी यांनी सांगितले.
सरकारी नोंदीनुसार देशात एकूण मृत्यू हे ४ लाख १९ हजार तर महाराष्ट्रात १लाख ३० हजार म्हणजे देशाच्या ३२ टक्के मृत्यू हे महाराष्ट्रात झाल्याचे दिसत आहे. Post covid ने झालेले मृत्यू,घरी झालेले मृत्यू यात धरलेले नसतात व संख्येबाबत चा संभ्रम बघता ही संख्या अजूनही जास्त असू शकते आम्ही कोरोना एकल महिला पुनर्वसन समितीच्या वतीने हाच अंदाज व्यक्त करत होतो आमच्या अंदाजापेक्षाही ही संख्या जास्त आहे. किमान जागतिक अभ्यासाने हेच वास्तव आता अधोरेखित केल्याने सरकारने तातडीने विधवा पुनर्वसन धोरण जाहीर करावे अशी मागणी आता केली जात आहे. राज्यातील 150 पेक्षा अधिक स्वंयसेवी संस्थांनी या महिलांना सरकारने आधार द्यावा यासाठी राज्यातील 20 जिल्ह्यातून एकाचवेळी 1400 इमेल मुख्यमंत्र्यांना पाठवून मागणी केली आहे.
0 टिप्पण्या