Ad Code

# MLA Suresh Dhas आमदार सुरेश धस यांचे कार्यकर्त्यांवर असेही प्रेम, विचारपुस करण्यासाठी बैलगाडीतून गाठले घर


बीड ः कार्यकर्ता हीच नेत्याची ताकद. त्यामुळे नेत्याने कार्यकर्त्यावर प्रेम करण्याला नेत्याला कार्यकर्त्याच्या मदतीने समाजकारण, राजकारण सोपे जाते. बीड जिल्ह्यातील नेते, आमदार सुरेश अण्णा धस तसे कार्यकर्त्यावर जीवापाड प्रेम करणारा नेता म्हणून त्यांची ओळख आहे. तसे अनुभही बीडकर अनुभवत आहेत. 

आमदार धस यांचे कार्यकर्त्यांवरील प्रेम लोकांनी अनुभवले. वीजेच्या धक्क्याने जखमी झालेल्या कार्यकर्त्याची विचारपुस करण्यासाठी आमदार सुरेश अण्णा धस यांना कार्यकर्त्याच्या घरी जाण्यासाठी बैलगाडीतून चिखलाची वाट तुडवट जावे लागले. सोशल मिडीयीवर बैलगाडीतील प्रवास आणि कार्यकर्त्याची भेट चांगलीच व्हायरल झाली आहे. (MLA Suresh Anna Dhas and Jivapad on the activist He is known as a loving leader. Beedkar feels the same wayAre. People felt the love of MLA Dhas for the workers.)

-----------

हे वाचा ः मदतीसाठी सरसावले हात, संकटकाळी मित्रांनी दिला मदतीचा आधार

--------

बीड जिल्ह्यातील कोळवाडी (ता. शिरुर कासार) येथील संभाजी नेटके हा तरुण कार्यकर्ता आठ दिवसापुर्वी शेतात काम करत असताना वीजेचा धक्का लागून गंभीर जखमी झाला. संभाजी हा आमदार सुरेश अण्णा धस यांचा कट्टर समर्थक कार्यकर्ता आहे. रुग्णालयात उपचार घेऊन संभाजी घरी आल्यावर त्याला भेटण्यासाठी आमदार सुरेश अण्णा धस यांनी थेट कोळवाडी गाठले. संभाजीचे घर शेतात आहे. 

घराकडे जाण्यासाठी पाणंद रस्ता. त्यातच नुकताच पाऊस झाल्याने रस्त्यावर चिखल होता. त्यामुळे आमदार सुरेश अण्णा धस यांनी बैलगाडीतून संभाजीच्या घरी जाऊन विचारपुस करत धीर दिला. आमदार धस अण्णा यांच्या सोबत कृष्णा तात्या पानसंबळ, युवक नेते कल्याण तांबे, सामाजीक कार्यकर्ते माऊली सिरसाट, उगलमुगले, सेवाश्रम प्रकल्पाचे प्रमुख सुरेश राजहंस, निवृत्ती बेदरे सर, कोळवाडीचे उपसरपंच नारायण मानकर, युवक नेते साईनाथ नेटके,   गोरक्ष महाराज भिलारे, युवराज बर्डे, सोनाजी मानकर, अंकुश नेटके, हरिराम सावंत यांच्यासह कार्यकर्ते व गावकरी उपस्थित होते. 

----

हे वाचा ः # corona काही होत नाही म्हणणाऱ्यांनो सावधान, कोरोना वाढतोय, दोन दिवसात रुग्णसंख्येत वाढ

----

अस्सल आणि ग्रामीण भाषेतील भाषणामुळे राज्यभर वेगळा ठसा असलेले आमदार सुरेश अण्णा धस कार्यकर्त्यावरही जीवापाड प्रेम करतात. मध्यंतरी एका कार्यकर्त्याच्या लग्रात ढोल वाजतानाचा व्हिडीओ प्रचंड प्रमाणात व्हायरल झाला होता. कार्यकर्ता आणि सामान्य नागरिकांना धीर देताना, त्यांच्यावर प्रेम करतानाचे त्यांचे अनेक किस्से, अनुभव बीड जिल्ह्याने अनुभवले आहेत. कोरोना काळातील नागरिकांसाठी दिलेले योगदानही राज्यभर आदर्श बनले आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu